बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 ठार तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक

बस आणि ट्रकचा भीषण अपघात

Updated: Feb 14, 2021, 10:32 AM IST
बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 ठार तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक title=

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील मदारपूर गावात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 14जण जागीच ठार झालेत तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालाय. 

या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झालेत.
जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावात ही अपघाताची घटना घडली. अपघातानंतर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगाने सुरू आहे.