फौजदारी खटल्यांविरोधात प्रियाची सुप्रीम कोर्टात धाव

सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली, मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2018, 08:00 PM IST
फौजदारी खटल्यांविरोधात प्रियाची सुप्रीम कोर्टात धाव title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली, मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. प्रिया प्रकाशवर हैदराबाद आणि मुंबईत  फौजदारी खटले दाखल आहेत, ते रद्द करण्याची मागणी प्रियाकडून सुप्रीम कोर्टाला करण्यात आली आहे.

दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांची याचिका

प्रियासोबत 'ओरु अदार लव्ह' या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटलं आहे, 'मनिक्या मलारया पूवी' या गाण्यावरुन निर्माण झालेल्या वादात अर्थ नाही.

फौजदारी खटल्यांविरोधातील याचिकेत म्हटलं आहे...

'मनिक्या मलारया पूवी' हे मालाबार क्षेत्रातील मुस्लिम समाजाचं हे लोकगीत मानलं जातं. कवी पीएमए जब्बार यांनी 1978 मध्ये हे गाणं लिहिलं आहे.  पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या पत्नी खदीजा यांच्यातील प्रेमाची त्यात प्रशंसा करण्यात आली आहे. 

४० वर्षापासून गात आहेत गीत

केरळमधील मुस्लीम समाज मागील ४० वर्षापासून हे गीत आनंदाने गात आहेत. काही मल्ल्याळम भाषिकांकडून हा वाद निष्कारण घातला आहे. गाण्यातून चुकीचा अर्थ काढून, तक्रार करण्यात आल्याचं याचिकेत म्हटलं आहे.