मान्सूनबाबत महत्वाची बातमी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आगेकूच सुरु

Arrival of monsoon in Kerala likely : IMD :  मान्सूनबाबत महत्वाची बातमी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आगेकूच सुरु मान्सूनची पुन्हा एकदा आगेकूच सुरु झाली आहे.  

Updated: May 27, 2022, 03:39 PM IST
मान्सूनबाबत महत्वाची बातमी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आगेकूच सुरु title=

मुंबई : Arrival of monsoon in Kerala likely : IMD :  मान्सूनबाबत महत्वाची बातमी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आगेकूच सुरु मान्सूनची पुन्हा एकदा आगेकूच सुरु झाली आहे. केरळमध्ये मान्सून काही तासांतच दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात गेले 5 दिवस मान्सून रखडला होता. 

आता मान्सूनने भारताच्या दिशेने पुन्हा एकदा आगेकूच सुरु केली आहे. पुढील 48 तासांत मान्सूनचे वारे आणखी प्रगती करतील. मान्सूनने पुन्हा वेग पकडल्यामुळे पुढील काही तासांत मान्सूनचे वारे केरळमार्गे देशात प्रवेश करतील. अरबी समुद्राकडून येणारे वारे येत्या 48 तासांत दक्षिण अरबी समुद्र, कन्याकुमारीचा भाग, संपूर्ण मालदीव आणि लक्षद्विपपर्यंतचा भाग व्यापतील अशी शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण पोषक आहे. 

 भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की, केरळमध्ये मान्सूनचे आगमन काही तासातच सुरु होणार आहे. आता 1 जूनपर्यंत राज्यात मान्सूनची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. तत्पूर्वी, हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला होता की नैऋत्य मान्सून 27 मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. तो पुढे जाण्याची किंवा चार दिवसांनी उशीर होऊ शकतो.

नैऋत्य मान्सून पुढील 48 तासांत नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे.