Hindenburg च्या साडेसातीनंतर अदानींच्या शेअर्सना 'अच्छे दिन'

Adani Share Rises: थोड्याच दिवसांपुर्वी आलेल्या हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर आता अदानींना सुखद धक्का मिळाला आहे. नक्की असं काय झालंय अदानींच्या शेअर्समध्ये मोठी उसळी झालेली पाहायला मिळते आहे. 

Updated: Feb 3, 2023, 05:16 PM IST
Hindenburg च्या साडेसातीनंतर अदानींच्या शेअर्सना 'अच्छे दिन'

Hindenburg vs Gautam Adani: हिंडनबर्गच्या एका रिपोर्टमुळे भारतीय उद्योगपती गौतम अदानींना मोठा धक्का बसला आहे. अदानींचे अनेक शेअर्स (Adani Share Price) हे जोरदार खाली कोसळले आहेत. या रिपोर्टनंतर अदानींना मोठा फटाका बसला आहे. यामध्ये अदानींचे 750000000000 इतक्या रूपयांचे नुकसान झाले आहे त्याचसोबत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप (Top Richest People) 3 यादीतून ते टॉप 20 च्याही बाहेर गेले आहेत. त्यामुळे एका रिपोर्टमुळे अदानींना झटाक्यावर झटके मिळाले आहेत. परंतु नुक्याच आलेल्या माहितीनुसार, थोड्याच दिवसांपुर्वी आलेल्या हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर आता अदानी एन्टरप्राईजला सुखद धक्का मिळाला आहे. (Adani Enterprises share rebounded 39% from its 52-week low, and the price rose by 500 rupees latest stock market news marathi)

अदानी एन्टरप्रायझेसच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे. सकाळी 1017 रूपयांवर घसरलेला शेअर दुपारनंतर जवळपास 500 रुपयांनी वधारला आहे. दुपारच्या सत्रात शेअरचा भाव 1570 रुपयांच्या वर गेला. कालच्या तुलनेत सध्या अदानी एन्टरप्रायझेस या अदानी समूहातील फ्लॅगशिप (Adani Enterprise) कंपनीत गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या या बातमीनं सगळीकडेच पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 

सध्या अदानींच्या या रिपोर्टनंतर शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतागूंत पाहायला मिळाली. त्यातून त्यांच्या शेअरमध्ये अनेकांनी केलेली गुंतवणूक झपकन काढून घ्यायली सुरूवात झाली. त्यामुळे कमी किमतीत हे शेअर्स विकले जात असताना त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेअर्स खरेदी करण्यावर भर दिसून येतो आहे. त्यामुळे अदानी एन्टरप्राईजचा हा शेअर वाढल्याची शक्यता आहे. परंतु हा सुखद धक्का नक्की किती वेळ राहील याबद्दलही काहीच शाश्वती देता येत नाही, असेही समजते. 

RBI आणि SEBI ची कारवाई? 

सध्या हिंडनबर्गच्या (Hindenburg Report) रिपोर्टनं फक्त देशातच नाही तर देशाबाहेरही मोठी खळबळ माजवली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, आरबीआय आणि सेबीनंही याबाबत कारवाई करणार असल्याची बातमी कळते. त्यापद्धतीनं तशी पावलं उचलली जाणार आहेत. त्यामुळे आता आरबीआयही सतर्क झालं आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचे लक्ष हे अदानींकडे लागले आहे. 

एफपीओ मागे घेतला... 

अदानी एंटरप्रायझेसने आपला 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ शेअर मार्केटमधून काढून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली होती. हेदेखील हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतरच घडले होते. अदानी एंटरप्रायझेसने आपला 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ शेअर मार्केटमधून काढून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. ऐन बजेटच्या दिवशी गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. कंपनीचे स्टॉक 794.15 रुपये घसरणीवरुन  2,179.75 रुपयांवर बंद झाले.