नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आज भारतात आले आहेत. भारतातील त्यांच्या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतील. गेल्या काही दिवसांमध्ये अशरफ गनी हे तिसरे सर्वात मोठे व्यक्ती आहेत. जे भारतात आले आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तानचे मुख्य कार्यवाह अब्दुल्लाह अब्दुल्ला आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी भारताला भेट दिली होती. दोन्ही नेत्यांनी गेल्या आठवड्यात भारताला भेट दिली होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 16 ऑक्टोबरला हनिफ अतमार यांना भेटण्यासाठी काबुलमध्ये गेले होते.
अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षा व्यतिरिक्त, अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरीरेक्स टिलरसन देखील आज भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्सने तालिबान्यांना पराभूत करण्यासाठी ज्या पद्धतीने आवाहन केले होते त्यानंतर अमेरिकेचे सचिव भारत भेटीवर येत आहेत. टिलरसनचा यांचा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. अफगाणिस्तानमध्ये आर्थिक स्थिरता आणण्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे.
त्याचबरोबर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशरफ गनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतील. दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय वाटाघाटी, विकास योजनांसह शांतता, सुरक्षा, दहशतवादाविरोधात लढा, प्रादेशिक मुद्दे, जागतिक मुद्दे आणि परस्पर हितसंबंध यासारख्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.