नवी दिल्ली : लक्ष्मी विलास बँकेनंतर (Lakshmi Vilas Bank) रिजर्व बँक ऑफ इंडियाने आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या अडचणींमध्ये वाढ
झाली आहे. आता रिजर्व बँकेने महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यातील Mantha Urban Cooperative Bankवर निर्बंध लादले आहेत. यासंबंधी आरबीआयने बँककेला काही निर्देश दिले आहे. जारी करण्यात आलेले निर्देश आजपासून पुढील ६ महिन्यांपर्यंत लागू करण्यात आले आहेत. आरबीआयने जारी केलेल्या या नव्या नियमांमूळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Mantha Urban Cooperative Bankवरील निर्बंध
- आरबीआयच्या परवानगी शिवाय Mantha Urban Cooperative Bank कोणालाही कर्ज देवू शकत नाही.
- बँक कोणतेही जुने कर्ज रिन्यू करू शकत नाही.
- Mantha Urban Cooperative Bank आरबीआयची परवानगी घेतल्याशिवाय कोठेही गुंतवणूक करू शकत नाही.
- नवीन ठेवी स्वीकारण्यासाठी बँकेलाही बंदी घातली आहे.
- बँक कोणतीही पेमेंट करू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा करार करण्यास सक्षम असेल.
लक्ष्मी विलास बँकेवरील निर्बंध
रिजर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) लक्ष्मी विलास बँकेवर काही प्रतिबंध घातले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातून एका महिन्याला फक्त २५ हजार रूपये काढता येणार आहेत. तर दुसरीकडे वैद्यकीय उपचार, शिक्षण इत्यादी आवश्यक खर्चासाठी २५ हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे.
सांगायचं झालं तर बँकेची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे बँकेला हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. बँकेची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर व्यवहार पुन्हा सुरळीत होतील असं देखील सांगण्यात येत आहे.