मोदींचे वारसदार कोण : योगी आदित्यनाथ ?

सध्यातरी भाजपमध्ये मोदीच सर्वेसर्वा आहेत. भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजेच भाजप अशी स्थिती आहे. 

Updated: Dec 4, 2017, 05:52 PM IST
मोदींचे वारसदार कोण : योगी आदित्यनाथ ? title=

लखनौ : सध्यातरी भाजपमध्ये मोदीच सर्वेसर्वा आहेत. भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजेच भाजप अशी स्थिती आहे. 

भाजपची स्थिती

नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेशातल्या महानगर पालिकांच्या निकालांनी अनेक मुद्दे चर्चेला आले आहेत. भाजपची उत्तर प्रदेशातली सध्याची ताकद, देशभरातलं भाजप बद्दलचं वातावरण, आगामी काळात होऊ घातलेली गुजरातची निवडणूक अशा वेगवेगळ्या मुद्दयांवर देशभरात चर्चा रंगतायेत.

युपीचं राजकारण

युपीच्या राजकारणात सध्यातरी भाजपचाच बोलबाला असल्याचं दिसतय. महानगर पालिकांच्या निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळालय. यामुळे आणखी एक गोष्ट ढळकपणे समोर आलीय, ती म्हणजे योगी आदित्यनाथांचं उत्तर प्रदेशच्या राजकारणातलं स्थान. भाजपच्या या यशात आदित्यनाथांचा वाटा मोठा आहे.

मोदींचे वारसदार

युपीमध्ये आणि एकंदरीतच भाजप, संघ परिवारात आदित्यनाथांची लोकप्रियता वाढतचं चाललीय. मोदींच्या छत्रछायेत वाढतावाढता योगी आदित्यनाथ त्यांचे वारसदार होऊ पाहताय. नाहीतरी आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून मोदींनंतर भाजपकडे योगी आदित्यनाथांचच नाव घ्यावं लागेल. येणाऱ्या काळात योगी आदित्यनाथ मोदींचे वारसदार ठरतात का ? हे येत्या काळात स्पष्ट होईल.