एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या

 मुंबईत पेट्रोल 14 तर डिझेल 21 पैशांनी महाग झाले.

Updated: Oct 4, 2018, 07:23 AM IST
एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या

मुंबई : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झालीय.. मुंबईत पेट्रोल 14 तर डिझेल 21 पैशांनी महाग झाले...मुंबईत आज पेट्रोलचे दर 91.34 तर डिझेलचे दर 80.10 आहेत.

पेट्रोल पंप अपग्रेड 

ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हे पाहता पेट्रोल कंपन्यांनीही पेट्रोल पंपावर असलेल्या आपल्या इंधन डिस्पेंसर्सला अपग्रेड करण्यास सुरूवात केलीयं. पेट्रोलच्या किंमती 3 अंकी झाल्यावरही डिस्पेंसर्सवर ते दिसावं यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.

जुन्या पंपांवर दोन आकडेच 

 बहुसंख्य पेट्रोल पंपाना अपग्रेड करण्याची गरज नाहीयं. पण जुन्या पेट्रोल पंपावर केवळ दोन आकड्यातल्याच किंमती दिसताहेत. येत्या दिवसात जर पेट्रोलच्या किंमतीत आणखी 10 रुपयांनी वाढ झाली तर जुन्या डिस्पेंसर्स वाल्या पंपांना अडचण होऊ शकते.  पण सध्या तरी पेट्रोल कंपन्यांना दरवाढ 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटत नाही.

कसे आहेत दर ?

केंद्र सरकारनं सीएनजीचा दर प्रती किलो 1.70 रुपयांनी वाढवलाय.. त्यामुळे  सीएनजी प्रती किलोला 46 रुपयांपर्यंत महागलाय. विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल 59 रुपयांनी तर अनुदानित सिलिंडरमध्ये 2.89 रुपयांची वाढ केल्यानं सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार आहेत.

विमान प्रवासही महाग 

 विमानाच्या इंधनाचे दरही वाढलेत. आता विमानाचं इंधन 2  हजार 650 रुपये प्रतिकिलो लिटरला विकलं जाणार आहे.. हा दर एटीएफअंतर्गत करण्यात आला आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.