Agniveer Recruitment: 'अग्निवीर' मध्ये कसे भरती होता येणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Indian Army Agniveer Recruitment New Process:भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केला आहे. नव्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान होणारा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त व्यवस्था कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Feb 4, 2023, 08:24 PM IST
Agniveer Recruitment: 'अग्निवीर' मध्ये कसे भरती होता येणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया title=

Indian Army Agniveer Recruitment New Process: भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीत गेल्या वर्षी अनेक तरूणांनी अर्ज केला होता. आता त्या तरूणांची ट्रेनिंग देखील सुरु झाली आहे. यावर्षी देखील ही भरती प्रक्रिया होणार आहे. मात्र भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केले आहेत. हे नेमके बदल काय असणार आहेत? हे जाणून घेऊयात. 

भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केला आहे. नव्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान होणारा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त व्यवस्था कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याची अधिसूचना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान या भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) द्यावी लागेल, त्यानंतर शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या द्याव्या लागतील.

ऑनलाइन लेखी परीक्षा

इच्छुक उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल.  उमेदवारांना सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) साठी नियुक्त चाचणी केंद्रे दिली जातील. परीक्षा 60 मिनिटांची असेल. परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जारी केली जाईल. पहिली ऑनलाइन परीक्षा (CEE) एप्रिल 2023 मध्ये सुमारे 200 ठिकाणी होणार आहे. ऑनलाइन अर्ज फेब्रुवारी २०२३ च्या मध्यापासून एक महिन्याच्या कालावधीसाठी खुले असतील.

शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी

जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील त्यांना शारीरिक चाचणी (Physical Test)आणि वैद्यकीय चाचणीसाठी  (Medical Test) बोलावले जाईल. दुसऱ्या फेरीच्या परीक्षेत शारीरिक चाचणी असेल आणि तिसरी आणि अंतिम फेरी वैद्यकीय चाचणी असेल.

शारीरिक चाचणी

महिला: 8 मिनिटांत 1.6 धावा, 15 सिट-अप आणि 10 सिट-अप
पुरुष: 1.6 धावा, 20 सिट-अप आणि 12 पुश-अप 6:30 मिनिटांत

दरम्यान यापूर्वी भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीच्या (Agniveer Recruitment) नियमांमध्ये, उमेदवारांना प्रथम शारीरिक फिटनेस चाचणी, नंतर वैद्यकीय चाचणी आणि शेवटी प्रवेश परीक्षा द्यावी लागत होती. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.