नवी दिल्ली : जातीयवादी वक्तव्ये करत भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांना तुरूंगवासाची शिक्षा द्या. तसेच, शिक्षेचा कालावधी हा तीन वर्षांचा असावा, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदूद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर बोलताना ओवेसी यांनी चर्चेत भाग घेतला. या वेळी बोलताना ओवेसी यांनी मागणी केली की, भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांना तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा द्यायला हवी. ही मागणी करताना मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार असे विधेयक आणणार नाही, असेही ओवेसी म्हणाले. दरम्यान, ओवेसी यांनी तिहेरी तलाखच्या विधेयकास विरोध करत हे विधेयक महिलाविरोधी असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, तीन तलाकला विरोध करताना देशातील सर्व मुस्लिमानी शरीयतचे रक्षण करण्यासाठी एकत्र यायला हवे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.