नवी दिल्ली : कॅप्टनच्या एका चुकीमुळे विमान प्रवाशांचा जीवावर कशाप्रकारे बेतू शकत हे आपण आतापर्यंतच्या विमान दुर्घटनांमध्ये पाहिलं असेल. अशा प्रकार काही चूक होऊ नये म्हणून विमान प्रशासनातर्फे काटेकोरपणे नियमांचे पालन केले जाते. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आलाय. एअर इंडिया विमानाचा कॅप्टन अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळल्याने त्याला विमान उड्डाणापासून रोखण्यात आलं. डायरेक्टर (ऑपरेशन्स) कॅप्टन अरविंद कथपालिया असं त्याचं नाव असून तो रविवारी प्री-फ्लाइट अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळला.
रविवारी दुपारी एअर इंडियाची AI-111 नवी दिल्ली ते लंडन फ्लाइटचा तो कॅप्टन होता.
अशाप्रकारे दोषी आढळण्याची त्याची ही दुसरी वेळ होती. याआधी 19 जानेवारी 2017 मध्ये तो दोषी आढळला होता.
Air India pilot Capt. Arvind Kathpalia has been grounded. DGCA has been informed to take necessary action: Air India Chief, Flight Safety. pic.twitter.com/DddFeofI27
— ANI (@ANI) November 11, 2018
याच्याविरोधात कारवाई करण्यासाठी एअर इंडियाने अरविंद कथपालिया विरोधात नागिक उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिलंय. 2017 साली नगर विमान महानिदेशालय (DGCA) ने घेतलेल्या उड्डाण पूर्व ब्रेथ एनालायजरमध्ये तो दोषी आढळला होता.
त्यावेळी त्याचा परवाना 3 महिन्यासाठी रद्द करण्यात आला होता. एवढंच नव्हे तर त्याला कार्यकारी निर्देशक, संचालन पदावरूनही हटविण्यात आलं होतं.
विमान नियमांनुसार फ्लाईट सुरू होण्याआधी 12 तास दारू पिण्यावर बंदी आहे. उड्डाण घेण्याआधी आणि उड्डाण घेतल्यानंतर याचे परिक्षण करणेही अनिवार्य आहे.
तीनवेळा नियमांचे उल्लंघन केल्यास पायलटचे लायसन्स रद्द करण्यात येते.