'दारुमुळे कोरोना घशातच मरेल, वाईन शॉप सुरु करा'

जर अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर्सनी कोरोना नष्ट होत असेल तर मग...

Updated: May 1, 2020, 03:47 PM IST
'दारुमुळे कोरोना घशातच मरेल, वाईन शॉप सुरु करा' title=

जयपूर: दारुमुळे कोरोनाचा विषाणू (Corornavirus) घशातच मरेल. त्यामुळे सरकारने राज्यातील दारुची दुकाने सुरु करावीत, अशी अजब मागणी राजस्थानमधील एका आमदाराने केली आहे. भरतसिंह कुंदनपूर असे त्यांचे नाव आहे. भरतसिंह हे सांगोड मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी राज्यातील दारुची दुकाने सुरु करण्यासाठी मुख्यंत्री अशोक गेहलोत यांना पत्र पाठवले आहे. 

या पत्रात भरतसिंह यांनी म्हटले आहे की, जर अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर्सनी कोरोना नष्ट होत असेल तर मग दारुचे सेवन केल्यावरही कोरोनाचा विषाणू घशातच मरेल. त्यामुळे राज्यातील दारुची दुकाने सुरु करावीत. दारूची दुकाने बंद राहिल्याने उलट मद्याचा काळाबाजार वाढला आहे. ही दुकाने सुरु झाल्यास सरकारला महसूलही मिळेल, असे भरतसिंह यांनी पत्रात म्हटले आहे. 

'वाईन शॉप' सुरु करायला काय हरकत, राज ठाकरेंची आग्रही मागणी

यापूर्वी आमदार बलवान सिंह पुनिया यांनीही मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे अशीच मागणी केली होती. दारुची दुकाने बंद राहिल्याने या उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच लोकांच्या आरोग्यवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावा पुनिया यांनी केला होता. 

मद्याची दुकाने उघडायला परवानगी नकोच; राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचाही विरोध

राजस्थानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २,६१७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या जयपूरमध्ये ३४ बळी गेले आहेत. शुक्रवारी राजस्थानात कोरोनाचे ३३ नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये अजमेरच्या ११ आणि चित्तोडगड व कोटामधील प्रत्येकी सात रुग्णांचा समावेश आहे. तर जोधपूर आणि राजसमंदमध्येही कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.