धक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती

मृत्यूनंतर माणसाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो असं म्हटलं जातं. 

धक्कादायक : मृत्यूच्या 5 तासांंनंतर जिवंत झाली व्यक्ती  title=

मुंबई : मृत्यूनंतर माणसाचा एक वेगळा प्रवास सुरू होतो असं म्हटलं जातं. पण मरणानंतर व्यक्ती पुन्हा 5 तासांत जिवंत होत असेल तर. मृत्यू झालेली व्यक्ती 5 तासांत जिवंत झाल्याचा  हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अतरौली या गावातील किरथल येथे हा प्रकार घडला आहे.

कुठे घडला हा प्रकार 

या गावांतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती व्यक्ती 5 तासांत जिवंत झाली आहे. मृत्यूनंतर या व्यक्तीच्या अंत्ययात्रेची सुरूवात करण्यात आली होती. आणि तेव्हाच ही व्यक्ती जिवंत झाल्याचा प्रकार घडला आहे. 53 वर्षीय किरथल गावांत रामकिशोर सिंह उर्फ भूरा सिंह काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. प्रकृती अस्वास्थामुळे यांचे निधन झाले होते. मात्र त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्याची तयारी सुरू असताना शरीरात हालचाल पाहायला मिळाली. हे पाहताच सर्वजण हैराण झाले.

आणि पाहतात तर काय, मृत्यू झालेले रामकिशोर अचानक उठून बसले आणि मी एकदम ठीक आहे. चुकून मला घेऊन गेले होते आता परत पाठवलं, असं रामकिशोर यांनी सांगितलं. रामकिशोर यांचे हे शब्द ऐकताच संपूर्ण गाव खूष झालं. रामकिशोर यांच्या असं जीवंत होण्यामुळे पंचक्रोशीतील लोक त्यांना पाहायला पोहोचले. मात्र मृत्यू नंतर नेमकं काय झालं हे रामकिशोर यांनी स्पष्ट केलं आहे. 

त्या 5 तासांत नेमकं काय घडलं? 

5 तासापैकी जास्त मला आठवत नाही. पण काही गोष्टी सांगता येतील. 'मी जेथे गेलो होतो तेथे एक बैठक सुरू होती. काही दाढीवाले महात्मा त्यांच्या वरिष्ठांशी बोलत होते. त्याचदरम्यान एका वृद्ध व्यक्तीने माझ्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. याला इथे का आणलं, अजून वेळ आहे, असं त्या वृद्ध व्यक्तीने म्हटलं. यानंतर लगेचच मला एक धक्का लागल्या सारखं झालं आणि जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी तुम्हाला रडताना पाहिलं, अशी माहिती रामकिशोर यांनी दिली.