तालिबानवर भारताची वेट अँड वॉच’ची भूमिका, सर्वपक्षीय बैठकीत सांगितली रणनीती

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्र मंत्रालय (MEA) यांची टीम यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना माहिती दिली.

Updated: Aug 26, 2021, 02:06 PM IST
तालिबानवर भारताची वेट अँड वॉच’ची भूमिका, सर्वपक्षीय बैठकीत सांगितली रणनीती title=

नवी दिल्ली : अफगाणिस्तान (Afghanistan) च्या मुद्द्यावर गुरुवारी भारत सरकार (Indian Government) ने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली परराष्ट्र मंत्रालय (MEA) यांची टीम यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारने सांगितलं की, ते आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. पण मुख्य फोकस हा लोकांना तेथून काढण्यावर आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थिती बिकट असल्याचं सांगितलं. तालिबान (Taliban) ने अमेरिकेला जे आश्वासन दिलंय. ते त्यांनी पूर्ण केलेलं नाही.

परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी सांगितलं की, 15 हजार लोकांनी हेल्प डेस्कवर संपर्क केला, संपूर्ण जग अफगाणिस्तानबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. भारत पण सध्या त्याच रणनीतीवर आहे. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणल्याच्या प्रयत्नांचं कौतूक केलं.

या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशी, पीयूष गोयल यांच्यासह शरद पवार, मल्लिकार्जुन खड़गे, अधीर रंजन चौधरी हे नेते उपस्थित होते.