close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमेझॉनवर आजपासून दिवाळी ऑफर, जाणून घ्या कशावर डिस्काऊंट

 अमेझॉन वर आजपासून दिवाळी स्पेशल जोरात सुरु 

Updated: Oct 21, 2019, 10:59 AM IST
अमेझॉनवर आजपासून दिवाळी ऑफर, जाणून घ्या कशावर डिस्काऊंट

नवी दिल्ली : ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर आजपासून दिवाळी स्पेशल जोरात सुरु असून शॉपिंग करण्याची मोठी संधी आहे. 25 ऑक्टोबरला रात्री ११.५९ पर्यंत तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरा, मोठे डिवाईस आणि टीव्ही, होम एंड किचन प्रोडक्ट, फॅशन ब्राण्डवर ऑफर मिळणार आहेत. स्मार्टफोन आणि इतर डिवाइसवर चाळीस टकक्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. 

यासोबतच फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट, मजेशिर एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआयचा फायदा मिळणार आहे. एपल, शाओमी, वनप्लस, सॅमसंग, वीवो, ऑनर आणि इतर ब्राण्डवर ऑफर आहेत. तसेच वन प्लस 7 T, सॅमसंग M30s आणि व्हिओ U10 वर अमेझॉनवर स्पेशल ऑफर मिळेल. वनप्लस 7T सीरीज ३७,९९९ रुपयांनी सुरु होत आहे. नवा रेडमी नोट ८ सीरीजचा स्मार्टफोन ९ हजार ९९९ रुपयांपासून सुरु आहे.

होम आणि किचन प्रोडक्टवर ऑफर

प्रेस्टीज, बाँम्बे डाइंग, पिगन, होमसेंटर सारख्या ब्राण्डवर शानदार ऑफर आहेत. याशिवाय दैनंदिन गरजेच्या वस्तूही तुम्ही स्वस्त दरात खरेदी करु शकता. अमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार स्वस्त वस्तू मिळण्याची ही शेवटची संधी आहे. 

या खरेदीमध्ये तुम्ही जर एक्सिस बॅंक, सिटी बॅंक आणि डेबिट कार्ड किंवा क्रेडीट कार्ड आणि रुपे कार्डने शॉपिंग करत असाल तर तुम्हाला दहा टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.