Brother Sister: धक्कादायक! 20 वर्ष एकाच खोलीत बंद होते बहीण-भाऊ; जिवंत राहण्यासाठी...

Ambala Sister Brother News: अंबाला येथे अशी एक धक्कादायक घटना (Shocking News in Ambala) घडली आहे. एक भाऊ बहीणीची जोडी एका खोलीत तब्बल 20 वर्षे एकत्र कोंडून होते. शेजाऱ्यांनी जेवण दिले म्हणून ते जिवंत राहिले. परंतु तुम्हाला माहितीये का नक्की (Brother Sister Prison for 20 Years) या दोघांसोबत घडले तरी काय? 

Updated: Mar 19, 2023, 02:20 PM IST
Brother Sister: धक्कादायक! 20 वर्ष एकाच खोलीत बंद होते बहीण-भाऊ; जिवंत राहण्यासाठी...  title=
ambala educated sister brother leaves prisoned life for 20 years get rescued by an social orgnisation in ludhiyana ambala news in marathi

Ambala Doctor Children Sister Brother Prison for 20 Years: भाऊ - बहीणीचे नाते हे (Sister Brother Relationship) जगावेगळे असते. आपण कुठल्याही देशात गेलो अथवा प्रांतात गेलो तरी आपल्याला बहीणीचे आणि भावाचे नाते सारखेच पाहायला मिळते. भावा बहीणींमध्ये रूसवे-फुगवे होतात त्याचबरोबर तितकीच चांगली मैत्री (Ambala Brother Sister News) आणि प्रेमही असते. संकटसमयी एकमेकांसाठी धावूनही येतात पण... तुम्ही जर का असं ऐकलंत की एकाच ठिकाणी, एकाच खोलीत एक बहीण आणि भाऊ तब्बल 20 वर्षे एकटे कोंडून होते? हो, हे खरं आहे. अशी घटना ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेच. आयुष्य हे अगदी क्षणभंगूर असतं. प्रत्येक क्षण अन् क्षण आपल्याला आनंदानं घालवायचा असतो. एकीकडे हे आपलं जीवनाचे सार असले तरी या भावंडांनी मात्र आपलं सहजीवन एकत्र घालवले खरे परंतु त्यांच्या आयुष्यात नरकासारखे जीवन होते. (ambala educated sister brother leaves prisoned life for 20 years get rescued by an social orgnisation in ludhiyana ambala news in marathi)

नक्की या भावा आणि बहीणीसोबत घडले तरी काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. ही घटना अंबाला येथील आहे. एका विद्यमान डॉक्टरची (Ayurvedic Doctor) ही दोन मुलं असल्याची माहिती समजली आहे. परंतु आपल्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर हे दोघंही बहीण भाऊ 20 वर्षे एकाच घरात बंद होते. लुधियानाच्या मनुख्ता दी सेवा संस्थेनं या दोघांची सुटका केली आहे. सोबतच एका अशा गरीब इसमाचीही सुटका केली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार हे तिघंही मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीत. या भांवडांपैंकी बहिणीनं तर एम. ए. बीएड (Educated Sister Brother) केले असल्याची धक्कादायक माहितीही कळते आहे. सध्या या तिघांची अशी अवस्था पाहून आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेली 20 वर्षे नक्की हे दोघं भावंडं करत तरी काय होते? आणि आईवडिलांच्या मृत्यूनंतर मात्र या दोघांची अशी अवस्था का झाली असावी असाही प्रश्न पडतो आहे.  

संस्थेचे सेवक काय म्हणाले? 

ज्या संस्थेनं यांची सुटका केली त्या संस्थेचे सेवक मिंटू माळवा (Ludhiyana) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे तिघंही अत्यंत अस्वच्छ ठिकाणी राहत होते. त्यातून त्यांची मानसिक स्थितीही वाईट आहे. बहिण ही सुशिक्षित आहे परंतु तिची मानसिक स्थिती नीट नव्हती म्हणून आपल्या भावासह ती एका खोलीत बंद होती. 

आम्ही अशा काही मंद आणि दुर्बल लोकांची सुटका करतो. अशा असाह्य लोकांना मदत करतो. आम्हाला अंबाला येथून यांचा व्हिडीओ हाती (Manukhata Di Seva Senstha) लागला होता. त्यानंतर वंदे मातरम दलासह त्यांनी आम्ही सुटका केली, असं त्यांनी सांगितले. 

20 वर्ष कोंडलेले असताना ही दोघं जिवंत कशी राहिली?

शेजारी त्यांनी जेवण वेळेवर द्यायचे म्हणून हे दोघं भावंड जिवंत राहिले होते. या दोघांसोबत ज्या एका माणसाची सुटका केली तोही रस्त्यावरच राहायचा. त्याला तर लघवीची आणि विष्ठेची माहिती नव्हती. त्याच्या एका खोलीत तर घाणीचा ढीग मिळाला, अशी माहिती समोर आली आहे.