Palestine विरुद्ध Israel ला मिळाली America ची साथ, बायडेन म्हणाले...

इस्रायला मिळाली अमेरिकेची साथ. बायडेन यांच्या या वक्तव्याने इस्राईलची ताकद वाढली.

Updated: May 13, 2021, 08:04 PM IST
Palestine विरुद्ध Israel ला मिळाली America ची साथ, बायडेन म्हणाले...

मुंबई : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर आता अमेरिकेने ही आता प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना आपल्या सुरक्षेचा सर्व हक्क आहे. एक प्रकारे बायडेन यांनी हे स्पष्ट केले आहे की ते इस्रायलबरोबर आहे आणि जर भविष्यात ही दोन देशांची लढाई जागतिक रूप धारण करते तर अमेरिका इस्रायलच्या समर्थनार्थ उभी राहील. यापूर्वी तुर्कीने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती.

माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, 'मला आशा आहे की हा संघर्ष लवकरच संपुष्टात येईल, परंतु मला असेही म्हणायचे आहे की, स्वत: च्या संरक्षणाचा इस्रायलला हक्क आहे. जेव्हा आपल्या देशावर हजारो रॉकेट्स येत असतील तेव्हा आपल्याला स्वतःचे रक्षण करण्यासाठी पावले उचलावी लागतील. बायडेन म्हणाले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासमवेत या संदर्भात त्यांनी फोनवर चर्चा केली.'

पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. इजिप्त आणि कतारने त्यांचे राजदूत पाठवले आहेत. पण परिस्थिती पाहता हे युद्ध लवकरच संपेल असे वाटत नाही. इस्रायलने म्हटले आहे की, तो त्याच्यावरील प्रत्येक हल्ल्याचा बदला घेत नाही, तोपर्यंत तो शांत बसणार नाही. 

सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 60 हून अधिक पॅलेस्टाईनियन मारले गेले आहेत, तर 6 इस्रायलच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, रशियाने म्हटले आहे की, संघर्ष सोडविण्यासाठी शक्य तितक्या लवकर मध्यस्थांची बैठक घ्यावी. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव (Sergey Lavrov)  म्हणाले की, तातडीची बैठक बोलावण्यात यावी, यामध्ये अमेरिका, युरोपियन युनियन, रशिया आणि संयुक्त राष्ट्रांचा समावेश असावा. लावरोव यांनी यूएनचे सरचिटणीस (Antonio Guterres) यांच्याशी ही चर्चा केली.