....म्हणून भारतात दाखल होतेय अमेरिकेची सुपरकॅरियर युद्धनौका

९० लढाऊ विमानं आणि ३००० नौदल जवानांसह.......   

Updated: Jul 20, 2020, 08:30 AM IST
....म्हणून भारतात दाखल होतेय अमेरिकेची सुपरकॅरियर युद्धनौका
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : china चीनसोबतच्या बिघडलेल्या समीकरणाच्या या वातावरणात America अमेरिकेकडून आता काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. ज्यांचा थेट परिणाम India भारत- चीन संबंधांवरही होण्याची चिन्हं नाकारता येत नाही. सध्याच्या घडीला चीनसोबत सुरु असणारे पेचप्रसंग पाहता अमेरिकेकडून दक्षिण चीनपासून हिंदी महासागरापर्यंतची गस्त वाढवण्यात आली आहे. 

चीनच्या नजीकच युद्धाभ्यास पूर्ण केल्यानंतर आता अमेरिकेच्या नौदलातील सातव्या तुकडीमध्ये सेवेत असणाऱ्या आणि लढाऊ विमानवाहू युद्धनौका USS Nimitz युएसएस निमिट्झ ही अंदमान निकोबार बेट समुहात दाखल होत आहे. या भागात भारतीय नौदल आधीपासूनच स्थित असून, येथे त्यांचा युद्धाभ्यास सुरु असल्याचं कळत आहे. परिणामी, भारत आणि अमेरिकेच्या नौदलांमध्ये येत्या काळात युद्धाभ्यास होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

चीनच्या वाढत्या युद्धखोरीवर वचक ठेवण्यासाठी हा युद्धाभ्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली. त्यातच दक्षिण चीनमधील भागात चीनच्या युद्धखोरीला अमेरिकेनंही सातत्यानं विरोध करणं सुरुच ठेवलं आहे. 

अमेरिकेच्या चीन युद्धनौका तैनात 

हिंदी महासागरात वाढत्या हालचाली पाहता अमेरिकेकडून या भागात तीन युद्धनौका तैनात ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामध्ये युएसएस रोनाल्ड रिगन आणि युएसएस थिओडोर रुजवेल्ट यांचा समावेश आहे. अमेरिकेकडून उचलली जाणारी ही पावलं पाहता चीनकडून आता वारंवार युद्धाच्या धमक्याही देण्यात येऊ लागल्या आहेत, त्याच धर्तीवर युएसएस निमिट्झ आणि भारतासोबतचा युद्धाभ्यास यामुळं चीनवर वचक राहणार आहे. 

 

युएसएस निमिट्झची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे... 

अमेरिकेच्या नौदलात असणाऱ्या युएसएस निमिट्झ या युद्धनौकेला सर्वशक्तिशाली मानलं जातं. आण्विक उर्जेवर चालणाऱ्या या लढाऊ विमानवाहू युद्धनौकेला अमेरिकनेच्या नौदलात ३ मे १९७५ ला सेवेत रुजू करण्यात आलं. ३३२ मीटर लांबीच्या या युद्धनौकेवर ९० लढाऊ विमानं आणि हेलिक़ॉप्टर्सशिवाय जवळपास ३००० सैनिक तैनात होऊ शकतात.