संपर्क फॉर समर्थन : अमित शाह धोनीच्या भेटीला

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली आहे.

Updated: Aug 5, 2018, 08:44 PM IST
संपर्क फॉर समर्थन : अमित शाह धोनीच्या भेटीला  title=

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली आहे. भाजपचं संपर्क फॉर समर्थन हे अभियान सध्या सुरु आहे. या अभियानाअंतर्गत भाजप अध्यक्ष वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या दिग्गजांच्या भेटी घेत आहेत. या भेटीमध्ये अमित शाह यांनी केंद्रातल्या भाजप सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती देणारं पुस्तक धोनीला दिलं. संपर्क फॉर समर्थन या मोहिमेअंतर्गत भाजप अध्यक्ष दिग्गजांच्या घरी जाऊन भाजपच्या कामगिरीची माहिती द्यायचे. यावेळी मात्र दिल्लीमध्येच अमित शाहंनी धोनीची भेट घेतली. यावेळी शाहंबरोबर केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि झारखंडमधले भाजप खासदार सरोज पांडेयही उपस्थित होते.

याआधी अमित शाहंनी मुंबईमध्ये २२ जुलैला लता मंगेशकर यांची भेट घेतली होती. संपर्क फॉर समर्थन अभियानामध्ये भाजप अध्यक्षांनी माधुरी दीक्षित, बाबा रामदेव, माजी लष्कर अध्यक्ष दलबीर सुहाग, कपिल देव, सुभाष कश्यप, माजी न्यायाधीश आरसी लाहोटी आणि बॅडमिंटनपटून सायना नेहवाल यांचीही भेट घेतली आहे.

अमित शाहंच्या या भेटीचा सिलसिला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू झाला होता. अमित शाहंनी ५० सेलिब्रिटींना भेटून भाजपच्या कामगिरीची माहिती देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.