अमिताभ बच्चन यांनी राम मंदिराजवळ घेतली जमीन; 15 मिनिटांवर असलेल्या भूखंडाची किंमत माहितीये?

Amitabh Bachchan : अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भगवान श्री रामच्या शहरात एक प्लॉट खरेदी केला आहे, ज्याची किंमत कोट्यावधींमध्ये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही जागा राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 15, 2024, 12:50 PM IST
अमिताभ बच्चन यांनी राम मंदिराजवळ घेतली जमीन; 15 मिनिटांवर असलेल्या भूखंडाची किंमत माहितीये? title=

Amitabh Bachchan bought plot in Ayodhya : 22 जानेवारीला अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण अयोध्येत जोरदार तयारी करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार देखील होणार आहे. येत्या काळात मंदिर पूर्ण झाल्यानंतर इथल्या आजूबाजूच्या जागेचे महत्त्व देखील वाढणार आहेत. अशातच बॉलिवुडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. राम मंदिरापासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर अमिताभ बच्चन यांनी ही जागा विकत घेतली आहे.

अयोध्येतल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून देशातील अनेक दिग्गज व्यक्ती या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. त्यातच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील राम मंदिराजवळ एक नवीन भूखंड खरेदी केला आहे. त्यांनी येथील जमीन 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या मुंबईतील विकासक कंपनीमार्फत खरेदी केली आहे. त्याचा आकार 10 हजार चौरस फूट असल्याचे सांगितले जाते.

अभिनेते अमिताभ बच्चन यांना रामाची नगरी असलेल्या अयोध्येत एक आलिशान घर बांधायचे आहे. त्यासाठी त्यांनी सेव्हन स्टार टाऊनशिप सरयूमध्ये अभिनंदन लोढा यांच्याकडून भूखंड खरेदी केला आहे. अभिनंदन हे मुंबई स्थित डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचे अध्यक्ष आहेत. अमिताभ बच्चन यांना तेथे 14.5 कोटी रुपये खर्चून 10,000 चौरस फुटांचे घर बांधायचे आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अयोध्येत गुंतवणूक केल्यानंतर,'अयोध्या या शहरासाठी माझ्या मनात विशेष स्थान आहे,' अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी सरयू एन्क्लेव्हचे लोकार्पण होणार आहे. हे 51 एकरात पसरल्याचे सांगितले जात आहे. याच प्रकल्पात अमिताभ बच्चन यांनी गुंतवणुक केली आहे. "अयोध्येतील सरयूमध्ये अभिनिंद लोढा यांच्या घरासोबत घर बांधण्यासाठी मी उत्साहित आहे. या शहराला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. अयोध्येतील अध्यात्म आणि संस्कृतीने भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाणारे भावनिक बंध निर्माण केले आहेत. अयोध्येत परंपरा आणि आधुनिकता एकत्र राहतात. मी या ग्लोबल स्पिरिच्युअल कॅपिटलमध्ये माझे घर बनवण्यास उत्सुक आहे," असे अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.