Amul Milk Price Hike : सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी, 'अमूल'चं दूध महागलं, 'असे' असतील नवे दर

Amul Milk Price Hikes : सोने-चांदी, पेट्रोल,डिझेल, गॅस आणि खाद्य तेल महाग झाले असताना आता अमुलचे दूधही महाग झाले आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या बजेटला पुन्हा झटका बसला आहे. 

Updated: Feb 3, 2023, 10:39 AM IST
Amul Milk Price Hike : सर्वसामान्यांना चिंतेत टाकणारी बातमी, 'अमूल'चं दूध महागलं, 'असे' असतील नवे दर  title=
Amul hikes milk price

Amul Milk Price Hikes in Maharashtra : वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या (Milk Rate Hike) दरात वाढ झाली आहे. अमूल दुधात ( amul milk price ) लिटरमागे 3 रुपयांनी वाढ झाली आहे. अमूलने देशभरात प्रतिलिटर तीन रुपयांनी दरवाढ जाहीर केली असून वाढलेल्या किमती आजपासून म्हणजेच 3 फेब्रुवारी 2023 पासून दरवाढ लागू झाली आहे. 

दरम्यान अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोनच दिवसात देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. याचा पहिला परिणाम सोने-चांदीच्या दरांवर दिसून आला आहे. त्यानंतर आता देशातील सर्वात मोठी दूध वितरक कंपनी अमूल यांनी आपल्या दूधाच्या किमतीत प्रतिलीटर 3 रुपयांनी वाढ केली आहे. अमूल कंपनीने जारी केलेल्या निवेदनात दरवाढीची माहिती दिली असून नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. 

वाचा: सोन्या-चांदीच्या दरात वाढ, ग्राहकांची वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका  

आता अमूलची अर्धालीटरची दूधाची पिशवी विकत घेण्यासाठी 27 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 1 लीटर दूधासाठी 54 रुपये द्यावे लागणार आहेत. अमूल गोल्ड म्हणजेच फुल क्रीम दूधाचे अर्धा लीटरचं पाकिट आता 33 रुपयांना मिळणार आहे. तसेच 1 लीटरसाठी 66 रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गायीच्या दूधाची 1 लीटरची किंमत आता 56 रुपये इतकी झाली आहे. तर अर्धा लीटर दुधासाठी 28 रुपये द्यावे लागणार आहेत. तर म्हशीचे A2 दूध आता 70 रुपये प्रतिलीटर किमतीला मिळणार आहे.

उत्पादन    -    (रुपयामध्ये) (Amul Milk New Prices)

  • अमूल ताझा 500 मिली -  27
  • अमूल ताझा 1 लीटर- 54
  • अमूल ताझा 2 लीटर - 108
  • अमूल ताझा  6 लिटर - 524
  • अमूल ताझा 180 मिली - 10
  • अमूल गोल्ड 500 मिली - 33
  • अमूल गोल्ड 1 लीटर - 66
  • अमूल गोल्ड 6 लीटर - 396
  • अमूल गायीचे दूध 500 मिली - 28
  • अमूल गायीचे  दूध 1 लीटर - 56
  • अमूल A2 म्हशीचे दूध 500 मिली - 35
  • अमूल A2 म्हशीचे दूध 1 लीटर - 70
  • अमूल A2 म्हशीचे दूध  6 लिटर - 420