Anand Mahindra Reaction On Viral Memes: महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नेटकऱ्यांशी संवाद साधत असतात. त्यामुळे एखादी पोस्ट केली की केली, नेटकऱ्यांच्या त्यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर काही पोस्टवर ते आपली ठाम प्रतिक्रिया देखील नोंदवतात. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने 15 ऑगस्टला 5 नव्या इलेक्ट्रिक एसयूव्ही अनवील केल्या आहेत. महिंद्रा अँड महिंद्राने या पाच इलेक्ट्रिक एसयूव्ही दोन EV ब्रँड अंतर्गत सादर केल्या आहेत. हे दोन ब्रँड XUV आणि BE आहेत. यात XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 यांचा समावेश आहे. मात्र या एसयूव्ही सादर केल्यानंतर सोशल मीडियावर एका पेक्षा एक असे मीम्स व्हायरल होत आहे. अशाच एका मीम्सवर आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका ट्विटर युजर्सने एक मीम्स ट्विट केलं होतं, यात 'टेस्ला भारतात येत नाही. यादरम्यान आनंद महिंद्रा सांगतात की, आम्ही व्यवस्थापन करतो, तुम्ही काळजी करू नका." या मीममध्ये मिर्झापूर वेब सिरीजमधील कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) या व्यक्तिरेखेचा फोटो आहे आणि 'हम करते हैं प्रबंध' हा डायलॉगही आहे. हे मीम पाहून आनंद महिंद्रा स्वतःला रोखू शकले नाहीत आणि प्रतिक्रिया देताना हसणारा इमोजी ट्विट केला.
— anand mahindra (@anandmahindra) August 15, 2022
या पाच e-SUV पैकी चार 2024 ते 2026 दरम्यान लाँच होतील. XUV.e8 डिसेंबर 2024 मध्ये, XUV.e9 एप्रिल 2025 मध्ये, BE.05 ऑक्टोबर 2025 मध्ये आणि BE.07 ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच केली जाऊ शकते. त्याच वेळी, BE.09 लाँच करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.