Anand Mahindra Share Cheeku Video : प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर (Anand Mahindra Viral Video) सक्रिय असतात. त्यामुळे ते ज्या कोणत्या पोस्ट शेअर करताना त्यांना तूफान लाईक्स येतात. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत महिंद्रा कंपनीच्या गाड्यांची क्रेझ असते. अशातच आता एका चिमुकल्याला देखील थार कार हवी होती. तेही फक्त 700 रुपयात... चिमुकल्याचा (Cheeku Video) एक व्हिडीओ व्हायरल होत होता, त्या व्हिडीओवर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी कोणती प्रतिक्रिया दिली अन् चिमुकल्याला काय गिफ्ट दिलं पाहा...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकताच चिकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चिकू नावाच्या मुलाने 700 रुपयात थार मिळेल का? असा सवाल विचारला होता. त्यावर आनंद महिंद्रा यांनी मजेशीर उत्तर दिलं. फक्त 700 रुपयांना थार कार विकायला सुरुवात केली तर आम्ही लवकरच दिवाळखोर होऊ, असं मजेशीर वक्तव्य आनंद महिंद्रा यांनी केलं. मात्र, महिंद्रा यांनी चिमुकल्याचा हिरमोड होऊ दिला नाही. त्यांनी चिकूला सरप्राईझ गिफ्ट दिलं.
CHEEKU goes to CHAKAN.
From a viral video to a real-life adventure…Cheeku, the young Thar enthusiast, visited our Chakan plant, bringing smiles and inspiration with him.
Thank you @ashakharga1 and Team @mahindraauto for hosting one of our best brand ambassadors!
(And I’m… pic.twitter.com/GngnUDLd8X
— anand mahindra (@anandmahindra) February 1, 2024
आनंद महिंद्रा यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चिकूला आयुष्यात कधीही विसरणार नाही, असं गिफ्ट दिलं. पुण्यातील प्रसिद्ध चाकणमधील प्लॅटची सफर करून दिली. आनंद महिंद्रा यांनी याविषयीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये चिकू चाकणमधील प्लॅटमध्ये फिरताना दिसतोय. थार कार कशी बनते? याचा धडा चिकूने चाकणच्या प्लॅटमध्ये घेतला अन् अधिकाऱ्यांनी चिकूला महिंद्रा कारचं एक छोटे मॉडेल देखील दिलं.
आनंद महिंद्रा म्हणतात...
चिकू चाकणमधील महिंद्रांच्या प्लांटमध्ये गेला होता. त्याचा व्हायरल व्हिडीओ आणि त्याचं सध्याचं वास्तविक चित्र, असा मथळा त्यांनी दिलाय. या व्हिडीओमध्ये चिकूने थार गाडीतून कंपनीमध्ये एन्ट्री केली. थारचा चाहता लाडका चिकू आमच्या चाकण प्लांटला भेट देतो आणि त्याच्याबरोबर गोड स्मित आणि प्रेरणा घेऊन येतो, असं महिंद्रा म्हणतात. मला आशा आहे की, यानंतर चिकू त्याच्या वडिलांकडे फक्त 700 रुपयांमध्ये थार विकत घेण्यासाठी हट्ट करणार नाही, अशी मजेशीर टिप्पणी देखील आनंद महिंद्रा यांनी केली आहे.