Anand Mahindra यांना मिळाला पुढच्या जनरेशनचा CWG गोल्ड मेडलिस्ट! व्हिडीओ व्हायरल

भारतात प्रतिभावंत लोकांची कमतरता नाही आणि हा व्हिडीओ त्याचा पुरावा देत आहे.

Updated: Aug 10, 2022, 08:49 PM IST
Anand Mahindra यांना मिळाला पुढच्या जनरेशनचा CWG गोल्ड मेडलिस्ट! व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात. ते काहीहीना काही भन्नाट गोष्टी आपल्या ट्वीटरवरती शेअर करत असतात. जे नंतर ट्रेंड देखील होऊ लागतं. आनंद मदिंद्रा सध्या असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याने सर्वांचं लक्ष त्यांच्या ट्वीटकडे वळलं आहे. नुकताच त्यांनी अशाच एका मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. (Anand Mahindra)

भारतात प्रतिभावंत लोकांची कमतरता नाही आणि हा व्हिडीओ त्याचा पुरावा देतो. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा हवेत असं काही करु लागतो की, आनंद महिंद्राही त्याचे चाहते झाले आहेत.

सर्वात आधी हा व्हिडीओ पाहा (Anand Mahindra Twitter)

हा व्हिडीओ शेअर करताना महिंद्रा यांनी लिहिले की, ''CWG2022 मध्ये भारतासाठी गोल्ड रशनंतर टॅलेंटची पुढची पिढी आकार घेत आहे. या टॅलेंटला फास्ट ट्रॅकवर आणण्याची गरज आहे.'' हा मुलगा तामिळनाडूतील तिरुनेलवेली गावात राहतो, असे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण मुलाचे कौतुक करताना दिसले.

17 सेकंदाच्या या व्हिडिओने अनेकांची मने जिंकली आहेत. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोक व्हिडीओला लाईकही करत आहेत.