मुंबई : विना घोड्याची घोडागाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. खरंतर हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. आनंद महिंद्रा हे भारतातील नामांकित उद्योजक तर आहेच, पण जगातील यशस्वी बिजनेसमॅनमध्ये ही त्यांचं नाव आहे. त्यांच्या बिजनेस व्यतिरिक्त आनंद महिंद्रा हे आणखी वेगवेगळ्या कामात व्यस्त असतात. तरी देखील सोशल मीडियावर ते खूप ऍक्टीव्ह असतात.
आनंद महिंद्रा यांना एखादी नवीन गोष्ट किंवा जुगाड असं काही दिसलं, की ते लगेचचं आपल्या सोशल मीडियावरुन शेअर करतात. त्यामुळे त्यांच्याकडून शेअर केलेली कोणतीही गोष्ट लोक आर्वजून पाहतात आणि लोकांना ते एन्टरटेनींगही वाटते.
आनंद महिंद्रा यांनी एका घोडागाडीचा व्हिडिओ शेअर करत, त्याची तुलना 1972 मधला क्लासिक सिनेमा ‘विक्टोरिया नंबर- 203’च्या सीक्वलसोबत केली. त्यांनी या घोडागाडीला‘विक्टोरिया ई-203’असे नाव सुचवले.
The sequel to the old movie Victoria No.203:
‘Victoria e-203’ pic.twitter.com/libGg1DDzQ— anand mahindra (@anandmahindra) March 9, 2021
वास्तविक पाहाता त्यांचा हा व्हिडिओ शेअर करण्याचे कारण म्हणजे घोडा नसलेली 'व्हिक्टोरिया बग्गी'. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल, तुम्ही पहिल्यांदा हे दृश्य पहाल तर तुम्हाला असे वाटेल की, ही घोडा गाडी घोडीच खेचत आहे, पण शेवटी नीट पाहिल्यावर तुम्हाला दिसेल की ती गाडी, बॅटरीवर कारप्रमाणे चालत आहे.
इंटरनेटवर जेव्हा हा व्हिडिओ टाकला, तेव्हा तर लोकांना तो इतका आवडला, की लोकांनी त्याला खूप शेअर केला. काही लोकांना आपले घोडा गाडीतून फिरणारे जूने दिवस आठवले तर काही लोकांनी या जुगाडची स्तुती केली.
सोशल मीडियावर या व्हिडिओला 38 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला, तर 1300 पेक्षा जास्त लोकांनी लाईक केला, आणि 130 पेक्षा जास्त लोकांनी त्याला रीट्विट केलं आहे.