लॅपटॉपवर आनंद महिंद्रा यांच्या गोष्टी ऐकणाऱ्या मुलीला वडिलांनी पकडलं आणि...

ही मुलगी आनंद महिंद्रा यांच्या गोष्टी ऐकत होती, आणि...

Updated: Oct 5, 2021, 02:17 PM IST
लॅपटॉपवर आनंद महिंद्रा यांच्या गोष्टी ऐकणाऱ्या मुलीला वडिलांनी पकडलं आणि... title=

मुंबई : उद्योगपती आनंद महिंद्रा कायम ट्विटरवर कायम ऍक्टिव्ह असतात. आनंद महिंद्रा ट्विटरच्या माध्यमातून अनेकांना प्रेरित देखील करतात. एवढंच नाही तर ते युझर्सच्या ट्विटवर प्रतिक्रिया देखील देतात. शिवाय सोशल मीडियावर त्यांचे भाषण देखील सर्वचं ऐकत असतात. फाउंडर डेच्या निमित्ताने एका युझरने एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर आनंद महिंद्रा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आता देखील आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये फक्त 2.7 वर्षांची मुलगी ते सांगत असलेल्या गोष्टी मन लावून ऐकत आहेत. सारंग बाकरे नावाच्या एका युझरने ट्विटरवर लिहिलं की,  'माझी 2.7  वर्षांची मुलगी समिक्षा फाउंडर दिनाचे भाषण अतिशय काळजीपूर्वक ऐकत आहे. फाउंडर दिनाच्या शुभेच्छा...'

सारंग बाकरे यांचं ट्विट आनंद महिंद्रा यांनी रिट्विट करत एक प्रश्न उपस्थित केला. 'मला आशा आहे की तुम्ही मुलीली असं करण्यासाठी कोणतेही लोभ (चॉकलेट) दिले नाही. हे पाहून खरोखरच माझ्या चेहऱ्यावर हास्य येते. मी आशा आणि प्रार्थना करतो की ती ज्या मूल्यांवर आणि मुख्य हेतूवर विश्वास ठेवते त्यामध्ये ती रुची आणि प्रेरणा घेत राहील.