High Return Stocks | फक्त 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 9 लाख; गुंतवणूकदार मालामाल

कोविड 19 च्या संसर्गाच्या संकटानंतरही शेअर मार्केटमध्ये 2021 या वर्षात तुफान तेजी पाहला मिळाली आहे

Updated: Oct 5, 2021, 01:28 PM IST
High Return Stocks | फक्त 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 9 लाख; गुंतवणूकदार मालामाल

नवी दिल्ली  : कोविड 19 च्या संसर्गाच्या संकटानंतरही शेअर मार्केटमध्ये 2021 या वर्षात तुफान तेजी पाहला मिळाली आहे. यामध्ये अनेक शेअर जबरदस्त रिटर्न देत आहेत. Rattanindia Enterprises च्या शेअरने गेल्या 6 महिन्यात 9 पट रिटर्न दिला आहे. शेअरने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. 

साधारण 800 टक्क्यांचा रिटर्न 
Rattanindia Enterprises च्या शेअर्सने मागील 6 महिन्यात साधारण 800 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. या शेअरची किंमत या वर्षी 30 एप्रिल रोजी 4.95 रुपये होती.  सोमवारी म्हणजेच 4 ओक्टोबर रोजी हा शेअर 44.60 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच एखाद्याने एप्रिलमध्ये या शेअरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 9 लाख रुपये झाली असती.

तसेच BSE सेंसेक्सने फक्त 19.87 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. मागील 1 वर्षात रत्तन इंडियाने साधारण 689 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. जानेवारी 2021 पासूनच या शेअरमध्ये साधारण 556 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 4 ऑक्टोबर रोजी या शेअरची मार्केट कॅप वाढून 6 हजार कोटी रुपये झाली आहे.

कंपनीचे कार्य
रत्तन इंडिया ग्रुप थर्मल पावर, रिन्युएबल एनर्जी, कंज्युमर फायनान्स इत्यादी व्यवसायात काम करते.

असे असले तरी एक्सपर्टने या शेअरमध्ये गुंतवणूक करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण कंपनीचे रेकॉर्ड या शेअर्समध्ये झालेल्या वाढीचा मेळ जुळत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी योग्य ऍनालिसिस करून निर्णय घ्यायला हवा.