Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा

Anantnag Encounter: सलग तिसऱ्या दिवशीही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झटापट सुरुच, अशा जागी लपून बसलेत दहशतवादी की त्यांना मिळतेय घनदाट वनांची मदत...   

सायली पाटील | Updated: Sep 15, 2023, 07:46 AM IST
Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा  title=
Anantnag Encounter continues for another day terrorist armed forces battle latest update

Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) सीमाभागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच राहतात. या कुरापतींना हाणून पाडण्यासाठी लष्कराकडूनही तोडीस तोड प्रयत्न केले जात आहेत. पण, सध्या मात्र इथं तणावाच्या वातावरणात आणखी भर पडताना दिसत आहे. कारण, जवळपास दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे सुरु असणारं एनकाऊंटर तिसऱ्या दिवशीही सुरुच असल्याचं कळत आहे. 

कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष धौंचक आणि डीएसपी मुजम्मिल हुमायूं भट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या द रजिस्टेंस फ्रंट संघटेनेच्या कमांडर उजैर आणि गाजी उस्मान या दोन्ही दहशतवाद्यांना अनंतनागच्या गडोल येथील वनपरिसरात संरक्षण यंत्रणांनी घेरलं आहे. दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या कारवाईमध्ये लष्कराच्या पॅरा कमांडो, राष्ट्रीय रायफल आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील जवामानांचा सहभाग असून, दहशतवाद्यांचा मागोवा घेत ही पथकं आता त्यांच्यासाठी आखलेल्या रणनितीनुसार पुढे जातना दिसत आहेत. यासाठी हेरोन ड्रोन आणि श्वानपथांचीही मदत घेतली जात असून, इथं असणाऱ्या घनदाट वनक्षेत्रार ड्रोन घिरट्या घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

पर्वतरागा आणि घनदाट वनांचा आधार घेत लपून बसलेल्या दहशतवाद्यांना घेरून त्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करानं अत्याधुनिक शस्त्रांचीही मदत घेतल्याची बाब समोर येत आहे. दहशतवाद्यांच्या प्रत्येत हालचालीवर नजर ठेवणाऱ्या संरक्षण यंत्रणा ते समोर येताच त्यांचा खात्मा करण्यासाठी आता सज्ज आहेत. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोहिमेसंदर्भात मोठी माहिती समोर 

जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह आणि त्यांच्यासोबतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिलालेल्या माहितीनुसार आता दहशतवाद्यांना चारही बाजुंनी घेरण्यात आलं असून, त्यांला खात्मा अटळ आहे. ज्या भागामध्ये दहशतवादी लपले आहेत तो अतिशय दुर्गम भाग असल्यामुळं या मोहिमेत काही अडथळे येत आहेत. पण, सध्या संरक्षण दलाच्या जवळपास 10 तुकड्यांनी त्यांना घेरल्यामुळं दहशतवाद्यांना पळ काढता येणं शक्यच नसल्याचंही ते म्हणाले. 

हेसुद्धा वाचा : काश्मीरात पुन्हा घातपाती कारवाया घडवण्याचा पाकिस्तानचा कट... भारताचे 3 बडे अधिकारी शहीद

 

बेछूट गोळीबार... 

सैन्य आणि पोलीस यंत्रणांनी गडोल भागाला छावणीचं रुप दिलं आहे. जिथं आता दहशतवाद्यांचा खात्मा करूनच ही मोहिम फत्ते होणार आर आहे. इथं चिनार कोरचे कमांडर आणि विक्टर फोर्सचे कमांडरही पोहोचले असून, त्यांनीही गोळीबाराचे आदेश दिले आहेत. लष्कराच्या या सापळ्याला भेदून निघण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्नही तेला, ज्यानंतर या भागात बेछूट गोळीबार झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लष्कराचे जवान कुलविंदर सिंग जखमी झाले, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखरल करण्यात आलं होतं.