कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

अशी काही घटना घडली की वनमंत्र्यांना तिथे राहणे कठीण झाले. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 24, 2017, 10:54 PM IST
कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला title=

बेळगाव : मंत्री घाबरुन पळून गेले अशी बातमी सगळीकडे पसरली. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला.  बातमी बेळगावातील असल्याचे समोर आले असून हे तिथले वनमंत्री आहेत. 

या ठिकाणी अशी काही घटना घडली की वनमंत्र्यांना तिथे राहणे कठीण झाले. 

उद्घाटन समारंभ 

कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय यांनी व्हीटीयू विद्यापीठ परिसराला भेट दिली. एका उद्यानाचे उद्घाटन वनमंत्र्यांच्याहस्ते होणार होते.  पण ही भेट मंत्र्यांच्या कायमची लक्षात राहिल. कारण उद्घाटन समारंभ पार पडण्याआधीच वनमंत्र्यांना आल्या पावली परत जावे लागले. 

मधमाशा बिथरल्या 

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वनमंत्री येत असलेल्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली होती. पण ड्रोनच्या आवाजाने तिथे असलेल्या मधमाश्या बिथरल्या आणि पोळ सोडून पळू लागल्या.

कुठे पळू ?, कुठे लपू ?

 यानंतर इथे जमलेल्या माणसांसमोर कुठे पळू, कुठे लपू असा प्रश्न उभा राहिला. मधमाशांच्या संकटातून वाचण्यासाठी माणसांनी रस्ता मिळेल तिथे धावायला सुरूवात केली. 

 वनमंत्र्यांचीही कूच 

 यावेळी वनमंत्र्याची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्यांनीही आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह आपल्या गाडीच्या दिशेने कूच केली.

घडलेला प्रसंग सर्वांच्या लक्षात राहण्यासारखाच होता. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x