स्वत:चं घर घेण्याची हीच योग्य वेळ असं का म्हणतात अनिल सिंघवी?

स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. अनिल सिंघवी यांनी घर खरेदी करण्याबाबत काय दिला मोलाचा सल्ला

Updated: Jul 16, 2021, 05:07 PM IST
स्वत:चं घर घेण्याची हीच योग्य वेळ असं का म्हणतात अनिल सिंघवी?

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. अगदी पेट्रोलपासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्व महाग झालं. मात्र यामध्ये रिअल इस्टेटचे भाव गडगडले आहेत. शेअर मार्केत तुफान तेजीत आहे. त्यामुळे आता गुंतवणूक रिअर इस्टेटमध्ये करायची की शेअरमध्ये असाही काहींना प्रश्न पडला आहे. बऱ्याच जणांना शेअरमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. ज्या लोकांचं घर घेण्याचं स्वप्न आहे किंवा जे घरात गुंतवणूक करणार आहेत. त्यांच्यासाठी ही वेळ योग्य आहे.

स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. याचं कारण म्हणजे रिअल इस्टेटचे कोरोना काळात उतरलेले भाव. त्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं स्वत:चं छोटं घर असायला हवं. ते स्वप्न पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं 'झी बिझनेसचे मॅनेजिंग एडिटर' अनिल सिंघवी यांचं म्हणणं आहे.

स्वत:चं घर घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळे घरासाठी गुंतवणूक करणं फायद्याची ठरू शकतं. तुमच्याकडे जर घर घेण्याएवढं पैसे एकरकमी नसतील पण अर्धे किंवा त्यापेक्षा जास्त पैसे असतील तर तुम्ही याच काळात घर घेतलं तर फायदा होऊ शकतो. 

कोव्हिडमुळे जरी बाकी सगळ्या गोष्टींचा किंमती वाढल्या असल्या तर घरांच्या किमती मात्र कमी झाल्या आहेत. काही ठिकाणी घरांच्या किमती स्थिर झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन घर घेण्याचा विचार करायला हरकत नाही. कारण भविष्यात घराच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.