Medical Miracle : निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करु शकतात. मात्र, उत्तर प्रदेशात एक असा प्रकार घडला आहे जे पाहून डॉक्टरही अचंबित झाले. सात महिन्याच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन या सात महिन्याच्या बाळाचा जीव वाचवला आहे. मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला 'फीटस इन फीटू' असे म्हणतात.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये हा प्रकार घडला आहे. प्रतापगड कुंडा येथील रहिवासी प्रवीण कुमार शुक्ला यांच्या पत्नीने 7 महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला होता. मात्र, प्रसुती दरम्यान त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या बाळाला जन्मल्यापासून पोट दुखीचा त्रास होत होता. बाळाचे पोट दिवसेंदिवस फुगल्यासारखे वाटत होते. सात महिन्याच्या या बाळाचे वजन आठ किलो झाले. प्रवीण कुमार शुक्ला यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले. शेवटी या बाळा घेऊन ते प्रयागराजच्या बाल रुग्णालयात गेले. येथे बाळाची सिटी स्कॅन टेस्ट करण्यात आली. यावेळी या सात महिन्याच्या बाळाच्या पोटात अणखी एक गर्भ असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले.
सिटी स्कॅन टेस्ट मध्ये आणखी माहिती समोर आली. बाळाच्या पोटातील गर्भाचे वजन 2 किलोच्या आसपास होते. तसेच या गर्भाचे हात, पाय हे अवयव देखील विकसीत झाले होते. ज्यावेळेच हे बाळ आईच्या पोटात वाढत होते. त्यावेळेस या बाळाच्या पोटात वाढत असलेल्या गर्भाचा विकास होत नव्हता. आईच्या पोटात दोन्ही गर्भ एकत्र वाढत होते. मात्र, यापैकी एकाचाच विकास झाला. कारण दुसरा गर्भ बाळाच्या पोटात होता. हे गर्भ वेगळे असते तर, महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला असता.
सात महिन्याच्या बाळाच्या पोटात गर्भ वाढत होता. जे नैसर्गिक आणि वैद्यकीयदृष्या अशक्य आहे. पोटात गर्भ वाढत असल्याने बाळाला प्रचंड त्रास होत होता. एक प्रकारे त्याचा जीवव धोक्यात होता. अखेरीस ऑपरेशन करुन बाळाच्या पोटात वाढत असलेला गर्भ काढण्याचा निर्णय घेतला. तब्बल सात तास या बाळाचे ऑपरेशन सुरु होते. प्रचंड गुंतागुंतीची अशी ही शस्त्रक्रिया होती. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत बाळाचा जूव वाचवला आहे. ऑपरेशनंतर बाळाचे वजन साडे पाच किलो इतके झाले आहे.