स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच गमावला एकुलता एक भाऊ; कॅप्टन दीपक सिंह वीरमरण, दोन बहिणींवर दु:खाचा डोंगर

उत्कृष्ठ हॉकी खेळाडू आणि युद्धभूमीवर कर्तव्यदक्ष अशा कॅप्टन दीपक सिंह डोडा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 15, 2024, 11:25 AM IST
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच गमावला एकुलता एक भाऊ; कॅप्टन दीपक सिंह वीरमरण, दोन बहिणींवर दु:खाचा डोंगर title=

देशभरात जिथे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतो. तेथे सिंह कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रक्षाबंधनाच्या पाच दिवस अगोदर दोन बहिणींनी आपला एकुलता एक भाऊ गमावला आहे. 

जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात कॅप्टन दीपक सिंह शहीद झाले आहेत. 25 वर्षीय कॅप्टन दीपक सिंह भारतीय सेनेचे 48 राष्ट्रीय रायफल्समध्ये सिग्नल अधिकारी पदावर होते. सेनाची एक टीम डोडा जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांच्या शोधात मग्न होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी लपून हल्ला केला. यामध्ये कॅप्टन दीपक सिंह शहीद झाले. 

कोण होते कॅप्टन दीपक सिंह? 

देहराडूनचे रहिवासी असलेले कॅप्टन दीपक सिंह 13 जून 2020 रोजी सैन्यात दाखल झाले. ते क्विक रिऍक्शन टीमचे नेतृत्व करत होते. कॅप्टन दीपक यांचे कुटुंब दूनच्या रेस कोर्समध्ये राहते, असे सांगितले जात आहे. दोन बहिणींमध्ये कॅप्टन दीपक सिंह हे एकुलता एक भाऊ होते. यात सहभागी होण्यासाठी देहराडूनला आले होते. त्याची मोठी बहीण मनीषा केरळमध्ये राहते. कॅप्टन दीपक सिंहचे आई-वडील त्याची मोठी बहीण मनीषाला भेटण्यासाठी केरळला गेले होते.

रक्षाबंधनापूर्वीच घडलं अघटित 

दीपक सिंह हे तीन भावडांमध्ये लहान होते. तीन महिन्यांपूर्वीच दीपक यांची लहान बहिण ज्योती हिचं लग्न झालं. तेव्हा दीपक कुटुंबियांना भेटले होते. आता दोन्ही बहिणी रक्षाबंधनाची तयारी करत असताना ही दुःखद घटना घडली. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मैदानातही तरबेज 

कॅप्टन दीपक सिंह हे अधिकारी तर होतेच तसेच ते हॉकी प्लेअर देखील होते. कॅप्टन दीपक हे फक्त रणांगणावरच नव्हे तर खेळाच्या मैदानावरही निष्णात होता. कॅप्टन दीपक हे हॉकी, टेनिससह अनेक खेळ खेळत असे. उत्कृष्ट हॉकीपटू असल्याने त्यांनेृी अनेक प्रसंगी उत्तम कामगिरी केली. रिव्हर व्हॅली रेसिडेन्शिअल वेल्फेअर असोसिएशनचे सचिव प्रदीप शुक्ला यांनी सांगितले की, जेव्हा ते रजेवर यायचे तेव्हा टेनिस खेळायला यायचे. त्याच्यात अप्रतिम ऊर्जा होती, जी खेळाच्या मैदानावरही दिसत होती. 

पोलीस मुख्यालयाने वाहिली श्रद्धांजली 

बुधवारी पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस महासंचालक अभिनव कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहीद कॅप्टन दीपक सिंह यांच्या फोटोला आदरांजली वाहिली. तसेच दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली.