वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांची मोठी घोषणा

Jobs in Medical Field: पंतप्रधान मोदींनी आपल्या लाल किल्ल्यातील भाषणातून देशाची सुरक्षा, रोजगार, कायदे अशा विविध विषयांवर भाष्य केले.

Pravin Dabholkar | Updated: Aug 15, 2024, 10:51 AM IST
वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांची मोठी घोषणा title=
वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार जागा निर्माण करणार- मोदी

Jobs in Medical Field: देशभरात आज 78 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले होते. पंतप्रधनांच्या हस्ते या ऐतिहासिक वास्तूवर ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशाची सुरक्षा, रोजगार, कायदे अशा विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भरतीमुळे नागरिकांना फायदा होणार आहे.

75 हजार जागा निर्माण करणार 

वैद्यकीय 75 हजार जागा निर्माण करणार असल्याची मोठी घोषणा केली. तर देशात होणा-या महिला अत्याचारावरून त्यांनी चिंता व्यक्त केली. याला समाज आणि राज्य सरकारनं गाभिर्यानं घ्याव, असं आवाहन त्यांनी केलं. तर राक्षसी कृत्य करणार-यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याची चर्चाही झाली पाहिजे, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी प्रशासकीय व्यवस्था, कृषी, शैक्षणिक, व्यापार, अंतराळ अशा क्षेत्रातील देश प्रगती करत असल्याचं ते म्हणाले.

हिंदूवरील अत्याचारावरून चिंता 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून बांगलादेशात झालेल्या हिंदूवरील अत्याचारावरून चिंता व्यक्त केलीय. हिंदू आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक  सुरक्षित असले पाहिजे, असंही ते म्हणाले. तर शेजारील देशांनी सुख-शांतीच्या मार्गावर चालावं, असं आवाहनही त्यांनी केलीय. 

तरुणांनी राजकारणात येण्याचे आवाहन 

राजकारणातील घराणेशाही संपवण्याची गरज आहे.. त्यासाठी 1 लाख नव्या तरुणांनी राजकारणात यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.. धर्माच्या आधारावर भेदभावातून मुक्ती मिळाली पाहिजे त्यासाठी सेक्युलर सिविल कोड काळाची गरज असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्य दिनी द्या 'या' 10 घोषणा; अंगात सळसळेल राष्ट्रभक्ती!

धर्मनिरपेक्ष नागरी कायद्याची गरज 

देशात एक धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा, अशी भूमिका आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून मांडलीय. सुप्रीम कोर्टानं समान नागरी कायद्याबाबत सुनावणी घेतली. त्यावर चर्चा झाली. आतापर्यंत आपण कम्युनल सिविल कोडमध्ये 75 वर्षं घालवली. आता देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा. यामुळे देशातील धार्मिक भेदभावापासून नागरिकांना मुक्ती मिळेल, असं मोदींनी ठणकावून सांगितलं. तर धार्मिक आधारावर देश तोडणा-या कायद्यांनाही स्थान नाही. यावरही  देशात व्यापक चर्चा व्हावी, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. 

स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना खूप दूर होते महात्मा गांधी? काय होतं कारण?

आरएसएसकडूनही चिंता व्यक्त 

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केलीय...शेजारच्या देशात उत्पात होतोय... हिंदूना त्रास दिला जातोय.आपण कधीच दुस-यावर हल्ला केला नाही, दुस-याला अडचणीत मदतच केली...मात्र, बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

हुशार असाल तर पटकन सांगा! वंदे मातरम सर्वप्रथम कधी, कुठे गायलं गेलं?