विधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत

निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी  http://zeenews.india.com/marathi/live​ वर क्लिक करा

शुभांगी पालवे | Updated: Dec 12, 2018, 12:01 AM IST
विधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत title=

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसशी सरशी झाली आहे. तर मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून काँग्रेस ठरलाय. काँग्रेसने मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा केलाय. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना रितसर पत्र पाठवून सरकार स्थापनेचा दावा काँग्रेसने केलाय.

तर छत्तीसगड आणि राज्यस्थानमध्येही भाजपचे सरकार काँग्रेसने खाली खेचले आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस 44 जागा जिंकल्या तर 24 जागांवर आघाडी घेतली होती. तर भाजपने 9 जागा जिंकल्या तर भाजपने 6 जगांवर आघाडी घेतली. अन्य 7 जागा. तर राज्यस्थानमध्ये भाजप 73, काँग्रेस 99 बीएसपी 6 तर अन्य 20 जागांवर विजयी झालेत.

तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांची जादू कायम आहे. तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षानं बहुमत मिळवलंय. 

टीआरएस 

टीआरएस

0 88
कांग्रेस काँग्रेस 0 21
बीजेपी भाजप 0 1
अन्य 

अन्य

0 9

तर मिझोरामध्ये मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आलेय. येथे काँग्रेसला पराभवाचा धक्का बसलाय. 

बीजेपी 

 भाजप

0 1
कांग्रेस 

काँग्रेस

0 5
एमएनएफ 

एमएनएफ

0 26
अन्य 

अन्य

0 8

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची सेमाफायनल मानल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पास झालेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी हा कठिण असा परीक्षेचा काळ आहे. सेमीफायनलमध्ये राहुल गांधींची सरशी झाली आहे. त्यामुळे आता २०१९ ला लोकसभा निवडणुकीत जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा

मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र लिहिले. या पत्राद्वारे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

मध्य प्रदेशचा शेवटचा निकाल रात्री 11.20 वाजता हाती आला त्यावेळी काँग्रेसने 107 जागा जिंकल्या होत्या. तर भाजप 101 जागांवर विजयी झाले होते. तर अन्य 2 ठिकाणी विजयी झालेत. त्यामुळे मध्य प्रदेशात त्रिशंकू स्थिती निर्माण झालेय. बहुमतासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे.

पाच राज्यांचे निवडणूक निकाल चित्र

 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसकडे बहुमत?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात सर्वात जास्त उत्सुकता निर्माण केली ती मध्य प्रदेशच्या निकालांनी... कधी भाजप तर कधी काँग्रेसला आघाडी मिळताना दिसत होती... आता मात्र पारडं काँग्रेसच्या बाजुनंच झुकल्याचं चित्र स्पष्ट झालंय. राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरामचेही निकाल आता स्पष्ट झालेत, असं म्हणायला हरकत नाही.  मध्य प्रदेशमध्ये मात्र अनिश्चिततेची स्थिती कायम आहे. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत अद्याप भाजप १०२ आणि काँग्रेस ११७ जागांवर आघाडी घेतलीय. परंतु, या निवडणुकीत सद्य मुख्यमंत्री शिवराज सिंह सरकारमधील बहुतांश मंत्र्यांना जनतेनं साफ नाकारल्याचं चित्र आहे. 

राजस्थान विधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेस सत्तेच्या जवळ 

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक जागांवर कब्जा मिळवला असला तरी त्यांना बहुमत मात्र गाठता आलेलं नाही. निवडणूक निकालापूर्वीच अशोक गहलोत आणि सचिन पायलट गट मुख्यमंत्रपदाच्या दाव्यासाठी सक्रीय झालेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत दिसून येतेय.

दुसरीकडे, भाजपनं आपल्या सर्व उमेदवारांना विजय घोषित झाल्याबरोबर जयपूरला पोहचण्याचे आदेश दिले आहेत. भाजप 'जुगाड' करून सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचं नुकतंच काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलंय. 

राजस्थानात काँग्रेस सत्तेच्या जवळ
राजस्थानात काँग्रेस सत्तेच्या जवळ

छत्तीसगढ विधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसला पूर्ण बहुमत 

छत्तीसगडच्या ९० जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तब्बल ५८ जागांवर आघाडी मिळवलीय. भाजपचे राजनंदगाव मतदारसंघाचे उमेदवार आणि सद्य़ मुख्य रमन सिंह पराभवाच्या छायेत आहेत... त्यांना काँग्रेस उमेदवार करुणा शुक्ला यांनी जोरदार टक्कर दिलीय. तर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी मरवाही मतदार संघातून तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत. 

२०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ४३ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती... आता मात्र सत्ताधारी भाजपला आपल्या हाती असलेल्या जागाही टिकवणं कठिण झालेलं दिसतंय. 

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०१८ : टीआरएसचा एकहाती विजय

तेलंगणाच्या ११९ जागांसाठी झालेल्या लढतीत काँग्रेस, भाजपला मागे टाकत स्थानिक पक्ष टीआरएस अर्थात तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षानं बहुमत मिळवलंय. त्यामुळे इथं सत्ता बदलाची काही चिन्हं दिसून येत नाहीत. हैदराबादमध्ये टीआरएस पक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं पक्ष कार्यालयाजवळ जमलेत. चंद्रशेखर राव जिंदाबाद असे नारे इथं ऐकू येत आहेत. मिठाई वाटून आणि नाचून इथं आनंद साजरा करताना कार्यकर्ते दिसत आहेत. 

एआयएमआयएमचे उमेदवार आणि असदुद्दीन ओवैसी यांचा भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांनी चंद्रयान गुट्टा मतदार संघातून विजय मिळवलाय. असदुद्दीन ओवैसी यांनी या अगोदरच आपलं समर्थन टीआरएसला असल्याचं स्पष्ट केलंय. 

वर्तमानात इथं तेलंगणा राष्ट्र समितीचं (टीआरएस) सरकार आहे आणि चंद्रशेखर राव इथले मुख्यमंत्री आहेत.

मिझोराम विधानसभा निवडणूक २०१८ : 

मिझोराममध्ये ४० जागांसाठी झालेल्या लढतीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना मागे टाकत एमएनएफ (मिझो नॅशनल फ्रंट) या पक्षानं बाजी मारलीय. यामुळे, इथे सत्ताबदल अटळ दिसतोय. मिझोरामम गेल्या १० वर्षांपासून काँग्रेस सत्तेत आहे. इथं आत्तापर्यंत कोणताही पक्ष सलग तीन वेळा सत्ता हस्तगत करू शकलेला नाही. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्ष सोडून एमएनएफ आणि भाजपला जाऊन मिळाले होते. याचाही पक्षाला जोरदार फटका बसलाय. मिझोरामचे मुख्यमंत्री आणि चम्पई साऊथ मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार लल थनहवला यांनादेखील पराभव स्वीकारावा लागलाय. एमएनएफच्या टी जे लालनूनटलुंगा यांनी त्यांना मात दिलीय. 

मिझोरामचे मावळते मुख्यमंत्री लल थनहवला
मिझोरामचे मावळते मुख्यमंत्री लल थनहवला  

दुपारी १२.१५ वाजता :

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम यामध्ये सर्वात चर्चेचा आणि चुरशीची ठरतेय तो मध्य प्रदेशची निवडणूक निकाल... याचं कारण म्हणजे, या राज्यात भाजपची सत्ता येणार की काँग्रेसची? याचा अंदाज दुपारी १२.०० वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांवरून लावता येणं कठीण दिसतंय. अजून स्पष्ट निकाल हाती आला नसल्यानं कधी पारडं काँग्रेसच्या बाजुनं झुकताना दिसतंय तर कधी भाजपच्या... आता पुन्हा एकदा काँग्रेसनं आघाडी घेतलेली दिसतेय 

विधानसभा निवडणूक निकाल २०१८ : सकाळी १२.१५ वाजता
विधानसभा निवडणूक निकाल २०१८ : सकाळी १२.१५ वाजता

सकाळी ११.४५ वाजता :

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१८ : मध्य प्रदेशाचं बहुमताचं पारडं पुन्हा एकदा भाजपच्या दिशेनं झुकलंय... काँग्रेस ११६, काँग्रेस १०५, बसपा ४ तर इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत... त्यामुळे, आता या निकालाची उत्सुकता अवघ्या देशाला लागलीय. इथे कोण सत्ता स्थापन करणार भाजप की काँग्रेस? हा उत्सुकतेचा विषय ठरलाय.  

सकाळी १०.५० वाजता :

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०१८ : मध्यप्रदेशमध्ये भाजपनं २३० जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवलेत... तर काँग्रेसचे २२९ उमेदवार रिंगणात आहेत काँग्रेसनं एक जागा सहकारी पक्ष शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दलासाठी दिलीय.

मध्यप्रदेशमध्ये सध्याच्या घडीला काँग्रेसच आघाडीवर दिसतंय. भाजप - ९९, काँग्रेस ११६, बसपा - ०५ तर इतर १० जागांवर आघाडीवर आहेत. 

विधानसभा निवडणूक निकाल २०१८
विधानसभा निवडणूक निकाल २०१८ : सकाळी ११.१५ वाजता

सकाळी १०.४५ वाजता : 

- मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का... भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह थंडावला

- काँग्रेसला ११६ जागांवर आघाडी... भाजप १०४ जागांवर पुढे... बसपा आणि इतरांना १० जागांची आघाडी 

सकाळी १०.०० वाजता : 

- छत्तीसगडपाठोपाठ राजस्थानमध्येही सत्तांतराची चिन्हं... राजस्थानात काँग्रेसला स्पष्ट बहुमताची आघाडी... काँग्रेसनं ठोकलं शतक

- छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर... भाजप - ८० काँग्रेस - १०५, बसपा - ०३, इतर - ०७

- मिझोराममध्ये एमएनएफची सत्ता... भाजप - ०२ काँग्रेस - १०, एमएनएफ - २२, इतर - ०६

- मध्यप्रदेशात त्रिशंकू परिस्थितीकडे वाटचाल... बसपासाठी फायद्याची स्थिती...  भाजप - ११० काँग्रेस - १०७, इतर - ११

- तेलंगणामध्ये काँग्रेसला दोन तृतियांश मतांची आघाडी  

सकाळी ०९.४५ वाजता : 

मध्य प्रदेश निवडणूक २०१८ : अचानक भाजपनं घेतली आघाडी... भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत... भाजप - १०९ काँग्रेस - १०९, इतर - ०७  

सकाळी ०९.३० वाजता : 

छत्तीसगढ निवडणूक २०१८ : छत्तीसगडच्या सर्व जागांचे कल हाती... मुख्यमंत्री रमण सिंह यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकणार? छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची स्पष्ट चिन्हं  

सकाळी ०९.१५ वाजता : 

- भाजपच्या हातून तीन राज्य निसटण्याची चिन्हं...

- राजस्थानात काँग्रेस आघाडीवर... भाजप - ७०, काँग्रेस - ९१, इतर ०८

- मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसच आघाडीवर... भाजप - ९८, काँग्रेस - १०४, इतर - ०५

- छत्तीसगडमध्ये भाजप - ३०  कांग्रेस - ५०, इतर ०६ जागांवर आघाडीवर

विधानसभा निवडणूक निकाल २०१८
विधानसभा निवडणूक निकाल २०१८

शेअर बाजार कोसळला 

शेअर बाजार कोसळला... प्राथमिक कलांचा शेअर बाजारावरही परिणाम... सेन्सेक्स ४०० अंकांनी तर निफ्टी १०० अंकांनी कोसळला 

सकाळी ०९.०० वाजता : 

- छत्तीसगढ निवडणूक २०१८ : काँग्रेस सत्तेच्या जवळ... बहुमतांसाठी काँग्रेसला केवळ ६ जागांची गरज... भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री रमण सिंह राजनांगगाव मतदार संघातून पिछाडीवर 

- राजस्थानात कांग्रेस ८० जागांवर आघाडी

- मध्य प्रदेशात काँग्रेसची ६० जागांवर आघाडी

- छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसची चुरस

- तेलंगणात टीआरएस काँग्रेसची चुरस

- मिझोराममध्ये काँग्रेस एमएफएन आघाडीवर

सकाळी ०८.५० वाजता : 

- राजस्थानात काँग्रेसला मोठी आघाडी

- काँग्रेसची पन्नाशीच्या दिशेने वाटचाल

- राजस्थानमध्ये भाजपला झटका

- मध्यप्रदेशात भाजप काँग्रेसमध्ये चुरस

- छत्तीसगडमध्ये चुरशीची लढत

सकाळी ०८.४० वाजता : 

तेलंगणा निवडणूक २०१८ : तेलंगाणामध्ये अनपेक्षित कल हाती 

तेलंगणा निवडणूक २०१८ : काँग्रस-टीआरएसमध्ये अटीतटीची लढत... काँग्रेस आणि टीआरएसला १६ जागांवर आघाडी

सकाळी ०८.३० वाजता : 

राजस्थान निवडणूक २०१८ : झारापालटानमधून मुख्यमंत्री वसुंधरा राजे पिछाडीवर 

राजस्थान निवडणूक २०१८ : राजस्थानात ५६ जागांचे कल हाती... काँग्रेस ३९, भाजप १७ जागांवर आघाडीवर

सकाळी ०८.२५ वाजता :

राजस्थान निवडणूक २०१८ :  राजस्थानात काँग्रेसला मोठी आघाडी... वसुंधरा राजे मंदिरात दर्शनासाठी  

राजस्थान निवडणूक २०१८ : शिक्षणमंत्री वासूदेव देवनानी पिछाडीवर... महिला व बालविकास मंत्री अनिता भदेल पिछाडीवर

छत्तीसगढ निवडणूक २०१८ : छत्तीसगडमध्ये अजित जोगी आघाडीवर 

सकाळी ०८.१५ वाजता :

राजस्थान निवडणूक २०१८ : भाजप ४ मतदारसंघात पुढे तर काँग्रेस ५ मतदारसंघात पुढे 

मध्य प्रदेश निवडणूक २०१८ : भाजप ३, काँग्रेस ५ मतदारसंघात पुढे

छत्तीसगढ निवडणूक २०१८ : छत्तीसगड भाजप ७ आणि काँग्रेस ९ मतदारसंघात पुढे

LIVE Assembly Elections Result 2018 : मध्य प्रदेशच्या निकालाची देशाला उत्सुकता
विधानसभा निवडणूक निकाल २०१८

नवी दिल्ली - अगदी सहा महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीची पूर्वपरीक्षा म्हणून ज्याच्याकडे बघितले जात आहे. त्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाचही राज्यातील मतमोजणी मंगळवारी होणार असून, हा निकाल केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी  http://zeenews.india.com/marathi/liveवर क्लिक करा.

मध्य प्रदेशमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. तर राजस्थानमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवत सत्ता हस्तगत केली होती. छत्तीसगढमध्येही भाजपचेच सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांत सत्ता राखण्यात भाजपला यश मिळणार की सत्तेवरून हा पक्ष पायउतार होणार हे बघणे महत्त्वाचे आहे. एक्झिट पोल्सनुसार या तिन्ही राज्यांत काँग्रेस भाजपला जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. 

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राजीनामा दिल्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होत आहेत. तिथेही त्यांचा तेलंगणा राष्ट्र समिती हाच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हे एक्झिट पोल्समधून दिसत आहेत. एक्झिट पोलमधील आकडे खरे ठरणार की वेगळाच निकाल पुढे येणार हे बघावे लागेल. 

मिझोराममध्येही काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात कडवी टक्कर आहे. काँग्रेस पुन्हा एकदा सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर मिझो नॅशनल फ्रंटनेही सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात, हे बघावे लागेल. 

मे २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता प्राप्त करायची असेल, तर भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीतील निकालांवरच भाजपची पुढील रणनिती ठरणार आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली घवघवीत यश मिळाल्यावर भाजपने पुढील वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकीतही यश संपादन केले होते.