रविवारी पृथ्वीजवळून जाणार एस्ट्रॉइड, याचा पृथ्वीला धोका किती? एक्सपर्ट काय म्हणाले वाचा

जेव्हा पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर 1.3 पट पेक्षा कमी असेल, तेव्हा ते पृथ्वीवर आढळेल.

Updated: Jul 24, 2021, 08:10 PM IST
रविवारी पृथ्वीजवळून जाणार एस्ट्रॉइड, याचा पृथ्वीला धोका किती? एक्सपर्ट काय म्हणाले वाचा

मुंबई : ताजमहालच्या आकारापेक्षा तीन पट मोठ्या आकाराचा एक लघुग्रह किंवा उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. नासाच्या मते, हे रविवारी घडणार आहे. पृथ्वीच्या या जवळून जाणाऱ्या या उल्काला  2008 GO20 असे नाव देण्यात आले आहे. जे ताशी 8.2 किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे येत आहे. हे आपल्या ग्रहापासून सुमारे 30 ते 40 लाख किलोमीटरच्या अंतरावरुन जाणार आहे.

या लघुग्रहची रुंदी 97 मीटर आणि लांबी 230 मीटर आहे. याचा आकार जवळजवळ चार फुटबॉल क्षेत्राइतका आहे. त्याचा आकार ताजमहालपेक्षा तीन पट असेल. नासाच्या मते, Near-Earth Object (NEO) किंवा पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या गोष्टीला लघुग्रह किंवा धूमकेतू म्हणून परिभाषित केली जाते.

जेव्हा पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर 1.3 पट पेक्षा कमी असेल, तेव्हा ते पृथ्वीवर आढळेल. म्हणून, कोणालाही या लघुग्रहबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. हे पृथ्वीवर अजिबात आढळणार नाही.

भुवनेश्वर, पठानी समंता प्लॅनेटेरियमचे उपसंचालक डॉ. शुभेंदू पटनायक म्हणाले की, 2008 GO20  पृथ्वीवर आढळण्याची शक्यता नसल्यामुळे घाबरायचे काहीच नाही. ते म्हणाले की, कोणीही घाबरुन जाऊ नये. आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत.

त्यांनी सांगितले की, हे लगुग्रह पृथ्वीपासून 1935 मध्ये पृथ्वीपासून सर्वात जवळून गेले होते, तर 1977 मध्ये ते पृथ्वीपासून 29 लाख किमी अंतरावर गेले होते. यावेळी हे पृथ्वीपासून 45 लाख किलोमीटर दूरुन जाईल. याचा अर्थ असा आहे की, चंद्रग्रह पृथ्वीच्या जवळ आहे. त्यापेक्षा 11 ते 12 पट जास्त अंतरावरुन हा लघुग्रह जाईल. 

पटनायक यांनी सांगितले की, 2008 GO20 हा रविवारी भारतीय वेळेच्या रात्री 11.21 वाजता पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. ते म्हणाले की, हा लघुग्रह ताशी 29 हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. इतक्या वेगाने येणाऱ्या लघुग्रहांच्या मार्गावर कोणतीही वस्तू आली तर, ती नष्ट होईल.

गेल्यावेळी 20 जून 2008 रोजी पृथ्वीच्या जवळून एक लघुग्रह गेला होता आणि पुढच्या वेळी 25 जुलै 2034 रोजी पुन्हा एकदा तो पृथ्वीच्या जवळून जाईल. मंगळ आणि गुरु दरम्यान लाखो लघुग्रह सूर्याच्या कक्षेत फिरत राहतात. कधीकधी ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जवळ येतात. त्यापैकी 99.99 टक्के लघुग्रह पृथ्वीची कक्षा गाठण्यापूर्वीच राख होतात.