लव्ह मॅरेजच्या 10 महिन्यांनंतर नवऱ्या समोर बायकोचं खरं रुप... व्हिडिओ पाहून नवऱ्याला जबरदस्त धक्का

अमितच्या हाती रुचीचा असा एक व्हिडीओ लागला जे पाहून अमितला मोठा धक्का बसला.

Updated: Jul 24, 2021, 06:52 PM IST
लव्ह मॅरेजच्या 10 महिन्यांनंतर नवऱ्या समोर बायकोचं खरं रुप... व्हिडिओ पाहून नवऱ्याला जबरदस्त धक्का

कानपूर : लग्नानंतर नवीन जोडपे आपलं नवीन आयुष्याची सुरुवात करतात. लग्नानंतरचा प्रत्येक दिवस ते एकमेकांना समजुन घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या काळात नवरा बायकोने एकमेकांना त्यांच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट सांगायला हवी. तर लग्न करण्यापूर्वी आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल जाणून घेणे तितकेच महत्वाचे असते, कारण त्याचा परिणाम पुढे जाऊन त्यांच्या संसारावर पडू शकतो. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका जोडप्याची अशीच परंतु थोडीशी वेगळी कहाणी सोमार आली आहे. येथे एक तरुण तरुणीच्या लग्नाना 10 महिने झाले होते. परंतु हे लग्न केल्यानंतर हा तरुण असा काही फसला की, त्याला आता सारख्या पोलिस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागत आहेत.

हे प्रकरण कानपूरमधील आहे, येथे गोविंद नगर काची बस्ती येथे राहणारे अमित शर्मा यांचे रुची वर्मासोबत आर्य समाज मंदिरात प्रेम विवाह झाले होते. लग्नानंतर त्या दोघांमध्ये सर्वकाही व्यवस्थित चालू होते. परंतु नंतर एक दिवस अमितने असा व्हिडीओ पाहिला ज्यामुळे त्याला धक्का बसला.

अमितच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होते, एक दिवस अचानक रुचीची आई आली आणि कुटुंबातील कोणाचे तरी लग्न आहे असे सांगून तिला आपल्यासोबत घेऊन गेली. कुटुंबातील सदस्याचे लग्न असल्यामुळे रुची सोबत दागिने आणि 50 हजार रुपये रक्कम घेऊन गेले.

अमितच्या म्हणण्यानुसार, यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्याने रुचीला कॉल केला तेव्हा तिचा मोबाईल बंद दाखवत होता. जेव्हा ती अनेक दिवस घरी परती नव्हती तेव्हा अमित तिला घेण्यासाठी तिच्या आईच्या घरी पोहोचला.

अमित रुचीच्या घरी पोहोचताच आश्चर्यचकित

अमित जेव्हा त्याच्या सासरी पोहोचला तेव्हा त्याची पत्नी आणि तिचे कुटुंबीय त्याच्या सोबत विचित्र पणे वागू लागले. यानंतर जेव्हा त्याने बायकोला त्याच्या सोबत घरी येण्यास सांगितले, तेव्हा तिने सोबत जाण्यास नकार दिला. अमितने तिला बऱ्याचदा विनवणी केली, परंतु तरीही त्याची बायको काही त्याच्यासोबत यायला तयार नव्हती. मग अमितला रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

परंतु नंतर काय झाले असावे? आपली पत्नी कोणत्या संकटात नाही ना? किंवा या मागील आणखी काही कारण आहे का? हे जाणून घेण्यासाठी अमितने तपास करायला सुरवात केला. तेव्ही अमितच्या हाती रुचीचा असा एक व्हिडीओ लागला जे पाहून अमितला मोठा धक्का बसला.

पोलिसांत तक्रार दाखल

रुचीच्या संशयक वागण्याचा शोध घेताना अमितला जो व्हिडीओ मिळाला, त्यामध्ये त्याची बायको दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्नाचे सात फेरे घेत होती. ज्यामुळे आमितला धक्का बसला.

त्यानंतर अमितने थेट पोलिस स्टेशन गाठले, त्याने पोलिसात तक्रार केली की, त्याला घटस्फोट न देता त्याच्या पत्नीने दुसर्‍या कोणाशी तरी लग्न केल आहे, आणि त्यामुळे रुचीवर फसवणूकीचा गुन्हा त्याने दाखल केला.

त्यानंतर चौकशीत असे आढळून आले की, रुचीने आतापर्यंत तीन विवाह केले आहे. रुची आणि तिची आई खूप आधीपासून लोकांची फसवूण करुन त्यांच्याकडून पैसे लूटतात.