मुंबई : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नव्या व्हेरिएन्ट विरोधात लढण्यासाठी ऑक्सफोर्ड/ ऍस्ट्राजेनेका लसीचा (Oxford/AstraZeneca Vaccine) सिंगल डोस कमी प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. UK सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांमुळे हा खुलासा झाला आहे. UK सरकारने केलेल्या नव्या संशोधनानुसार, भारतीय व्हेरिएन्टवर ऑक्सफोर्ड/ ऍस्ट्राजेनेका कमी प्रभावी असल्यामुळे लसीचे दोन डोस घेणं अत्यंत महत्त्वाचं आसल्याचं सांगण्यात आलं आहे.
ब्रिटनच्या पब्लिक हेल्थ इंग्लंडने (PHE) जारी केलेल्या आकड्यांनुसार, भारतात आढळलेल्या B.1.617.2 व्हेरिएन्ट विरोधात लढण्यासाठी ऑक्सफोर्ड/ ऍस्ट्राजेनेका लसीचे दोन डोस 81 टक्के प्रभावी आहेत. तर दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये पहिल्यांदा आढळलेल्या B.1.1.7 व्हेरिएन्ट विरोधात लढण्यासाठी 87 टक्के प्रभावी आहे.
समोर आलेल्या आकड्यांनुसार, लसी एक डोस B.1.617.2 व्हेरिएन्टवर 33 टक्के तर B.1.1.7 व्हेरिएन्टवर 51 टक्के गुणकारी असल्याचं सिद्ध झालं आहे. फायनान्शियल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तनुसार, लसीचा एक डोस B.1.1.7 व्हेरिएन्टच्या तुलनेत B.1.617.2 व्हेरिएन्टवर 35 टक्के कमी सुरक्षा प्रदान करतो.
PHE ने बायोएनटेक/फायझर आणि ऑक्सफोर्ड/ ऍस्ट्राजेनेकाने (Oxford/AstraZeneca vaccine) लसीच्या माहितीचं मूल्यांकन केलं आहे. PHE ने सांगितलं की, ऑक्सफोर्ड/ ऍस्ट्राजेनेकाल लसीचे दोन डोस 85 ते 90 टक्के प्रभावी आहे.