शहीद जवान औरंगजेबच्या भावाने घेतली शपथ

औरंगजेबचा भाऊ घेणार हत्येचा बदला...

Updated: Jun 16, 2018, 04:44 PM IST
शहीद जवान औरंगजेबच्या भावाने घेतली शपथ

नवी दिल्ली : देशासाठी प्राण देणाऱ्या औरंगजेबच्या भावाने आपल्या भावाच्या जागी आपली पोस्टींग करण्यात यावी अशी मागणी केली आहे. ज्यामुळे मी माझ्या भावाचा हत्येचा बदला घेऊ शकेल. ऐवढंच नाही तर त्यांनी म्हटलं की, माझा जीव गेला तरी 100 दहशतवाद्यांचा मी खात्मा करेल. जम्मूच्या पुलवामा येथून जवान औरंगजेबचं अपहरण करुन त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

जवान औरंगजेबच्या वडिलांनी 72 तासाचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. शहीद रायफलमॅन औरंगजेबच्या वडिलांनी म्हटलं की, भारत सरकारने दहशदवाद्यांविरोधात कडक पाऊलं उचलावी. त्यांना कोण रोखत आहे. ज्यांनी माझा मुलाला मारलं त्यांच्याविरोधात जर सरकारने काही कारवाई नाही केली कर येत्या 72 तासात मी माझ्या मुलाच्या हत्येचा बदला घेईल.

शहीद जवानाच्या वडिलांनी राजकारण करणाऱ्य़ांवर देखील टीका केली. औरंगजेबच्या हत्येने फक्त कुटुंबियांचंच नाही तर भारतीय लष्कराला देखील झटका लागला आहे. 2003 पासून सरकारने काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा खात्मा का नाही करु शकली.