बंगळुरु : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. रामाच्या नावावर वाद होता कामा नये, असे सांगत हा वाद लवकरच सुटेल अशी आशा यूपी शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिझवी यांनी मंगळारी श्री श्री रविशंकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत श्री श्री रविशंकर मध्यस्थी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी रिझवी यांची भेट घेतली.
अयोध्येच्या वाद लवकरच सुटेल. रामाच्या नावावर वाद होता कामा नाही पाहिजे. खरं तर, या समस्येवर मध्यस्थी श्री श्री रवीशंकर यांनी केलेय. संपूर्ण देश श्री श्री रविशंकर यांचा आदर करत आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, हा वादावर तोडगा निघेल. ज्याबद्दल वाद आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. दोन्ही पक्ष कारांमध्ये चर्चा होऊन समाधानकारक तोडगा निघेल, असे रिझवी म्हणालेत.
विरोध करणाऱ्यांवर रिझवी यांनी तोंडसुख घेतले. हा वाद मिटला पाहिजे. त्याचे निराकरण करण्यासाठी लोक या समस्येशी सहमत आहेत. आम्ही या परिस्थितीबद्दल बोलत आहेत. जे लोक बोलतात त्यांच्याकडे कायदेशीर आधार नाही, असे रिझवी म्हणालेत.
या आधी २८ ऑक्टोबर रोजी अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की, अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावर आता परिस्थिती बदलली आहे आणि लोकांना शांतता हवी आहे. अशी माहिती त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. जेथे दोन्ही समुदायातील लोक बंधुत्वाचा पुरस्कार करत आहेत. दरम्यान, २००३-२००४ मध्ये बोलणी झालीत. मात्र, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्याचा चर्चा अधिक पुढे गेली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.