तुमच बँकेत अकाऊंट आहे? तर ही बातमी नक्की वाचा

तुमचं बँकेत अकाऊंट आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 22, 2017, 03:38 PM IST
तुमच बँकेत अकाऊंट आहे? तर ही बातमी नक्की वाचा title=
Representative Image

नवी दिल्ली : तुमचं बँकेत अकाऊंट आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

तुम्ही तुमच्या बँक अकाऊंटकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित तुमचं बँक अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार काही बँक खाते गोठविण्यात येत आहेत.

नव्या नियमांनुसार, ज्या बँक अकाऊंटमध्ये सलग दोन वर्षांपासून कोणतेही व्यवहार झाले नसतील किंवा ते अकाऊंट निष्क्रिय असेल असे अकाऊंट बंद करण्यात येत आहेत.

दरम्यान, या नियमासंदर्भात विविध बँकांनी आपल्या ग्राहकांना मेसेज किंवा कॉलकरुन माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार हा नियम सेव्हींग आणि करंट अकाऊंट या दोघांसाठी लागू आहे.

व्यवहार होत नसल्यामुळे तुमच्या बँक अकाऊंटचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी तुमचं बँक अकाऊंट बंद करण्यात येत. तुमचंही बँकेत अकाऊंट आहे आणि त्यामध्ये तुम्ही व्यवहार करत नाहीयेत तर मग तुम्ही बँकेसोबत संपर्क साधा. अन्यथा तुमचं बँक अकाऊंट बंद होऊ शकतं.