चोराच्या उलट्या बोंबा! महिलेने बँकेतून पैसे काढले अन्... CCTV मधून सत्य घटना समोर

Bank News : एक महिला बँकेत पैसे काढायला गेली. त्यानंतर बँकेत तिने पैसे काढल्यानंतर गोंधळ घातला. परिणामी त्या महिलेची समजूत काढण्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांना हातील कामे सोडावी लागली. त्यानंतर पुढे काय जाणून घ्या...

Updated: Dec 19, 2022, 01:29 PM IST
चोराच्या उलट्या बोंबा! महिलेने बँकेतून पैसे काढले अन्... CCTV मधून सत्य घटना समोर    title=

Bank Story : झारखंडमधील पलामू जिल्हृ्यातील हरिहरगंज ब्लॉक ऑफिससमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या एसबीआय (SBI Bank) शाखेतून एका महिलेने पैसे काढले. महिलेने तिच्या खात्यातून 49 हजार रुपये काढले आणि महिलेने पैसे मोजण्यास सुरुवात केली. पैसे मोजताना तिला 500 रूपये कमी असल्याचे जाणवले. 

बँक कॅशियरवर पैसे चोरल्याचा आरोप

500 रूपये कमी पाहता तिने बँकेतील पैसे देणाऱ्या कॅशियरवर (bank cash counter) पैसे कमी दिल्याचा आरोप केला. हा गोंधळ एवढा मोठा होता की बँकेचे व्यवस्थापक आणि इतर ग्राहकही तिथे जमा झाले.  गोंधळ इतका वाढला की बँकेत नेमकं काय घडले याचा तपास घेण्यास सीसीटीव्ही कॅमेरे चेक करावे लागले. पण सीसीटीव्ही (cctv) मधील दृश्य बघताच सर्वांते होश उडाले. 

सीसीटीव्हीत सत्य उघडकीस
 
कारण त्यावेळी बँक कॅशियरवर पैसे कमी दिल्याचे मान्य करत नव्हता. तर दुसरीकडे ती महिला देखील ऐकायला तयार नव्हती. बँकेतील गोंधळ पाहता बँकेचे व्यवस्थापक यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्याचे आदेश दिले. बँकेत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी सत्य घटना समोर आली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेने 500 रुपये लपवल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेजवरून सत्य समोर आल्यानंतर महिलेने आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली आणि बँकेतून निघून गेली.

 वाचा : नवं वर्ष 12 नाही तर 13 वर्षांचं, 2023 हे वर्ष फार खास असणार 

या प्रकरणी बँक व्यवस्थापकाची प्रतिक्रीया

या घटनेबाबत एसबीआय बँकेचे व्यवस्थापक राजीव कुमार रंजन (rajiv kumar ranjan) म्हणाले की, बँकेतील सर्व कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काही खातेदार कर्मचाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बँक व्यवस्थापकांनी खातेदारांनी एकत्र येऊन बँकेची प्रतिमा खराब करू नये, असे आवाहन केले आहे.