Bank Holidays in August | 5 दिवस बँक बंद, पाहा संपूर्ण यादी

तुम्ही जर आजपासून (19 ऑगस्ट) 5 दिवसात बँक व्यवहार करण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Updated: Aug 19, 2021, 05:33 PM IST
Bank Holidays in August |  5 दिवस बँक बंद, पाहा संपूर्ण यादी

मुंबई : तुम्ही जर आजपासून (19 ऑगस्ट) 5 दिवसात बँक व्यवहार करण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील 5 दिवस विविध शहरात बँका बंद असणार ( Bank Holidays in August) आहेत. त्यामुळे बँकेतील महत्वाचं काम पूर्ण करण्याच्या आधी एकदा कोणत्या शहरात केव्हा बँक बंद असतील याची सविस्तर यादी पाहून घ्या. (banks closed for 5  days from 19 to 23 august 2021 see all holiday list)  

सलग 5 दिवस बँक बंद 

विविध शहरांमध्ये बँका या 5 दिवस बंद असणार आहेत. यामध्ये आज 19 ऑगस्ट (मोहरम), 20 ऑगस्ट (ओणम), 21 ऑगस्ट थिरुवोणम असल्याने बँक बंद असणार आहेत. तर 22 ऑगस्टला रविवार आहे. 23 ऑगस्टला संबंधित शहरात नारायण गुरु जयंतीमुळे बँक बंद असणार आहेत. अशाप्रकारे जोडून आलेल्या विविध सुट्ट्यांमुळे 5 दिवस बँक व्यवहार बंद असतील. 

आज (19 ऑगस्ट) मोहरम आहे. त्यामुळे मुंबई, बेलापूर नागपूर, जयपूर, कानपूर,  आगरताळा, अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद, कोलकाता,  लखनऊ, नवी दिल्ली,  पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगरमधील बँका बंद आहेत. 

तर 20 ऑगस्टला ओणम निमित्ताने बंगळुरु, चेन्नई, कोच्ची, तिरुवनंतपूरममध्ये बँक बंद असतील. तसेच 21 ऑगस्टला थिरुवोणम आणि 23 ऑगस्टला नारायण गुरु जयंती निमित्ताने कोच्ची आणि तिरुवनंतपूरमध्ये बँक व्यवहार होणार नाही. 

ऑगस्टमध्ये एकूण 15 दिवस सुट्ट्या...

रिझर्व्ह बँकेनुसार, देशातील विविध शहरांमध्ये 15 दिवस सुट्ट्या असल्याने बँका बंद राहतील. मात्र या सुट्ट्या सर्वच राज्यांना एकाच वेळी लागू होत नाहीत. संबंधित राज्यात एखाद्या महत्वाच्या दिवशी तेथील बँक बंद असेल. मात्र इतर शहरात त्या दिवशी व्यवहार सुरळितपणे सुरु राहतील.

कोणत्या राज्यात बँका केव्हा बंद असणार? 

19 ऑगस्ट | मोहरम  – आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची आणि श्रीनगर.  

20 ऑगस्ट |  मोहरम/ओणम – बंगळुरू, चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपूर

21 ऑगस्ट | तिरुवोनम – तिरुअनंतपुरम आणि कोची. 

22 ऑगस्ट | रविवार

23 ऑगस्ट | नारायण गुरु जयंती : तिरुअनंतपुरम आणि कोची

28 ऑगस्ट | चौथा शनिवार 

29 ऑगस्ट | रविवार....

30 ऑगस्ट | कृष्ण जन्मोत्सव :  अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक

31 ऑगस्ट | श्री कृष्ण अष्टमी :  हैदराबाद