credit-debit card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! तूमचा पासवर्ड लीक झाला आहे का?

कधी आपला कुठला डेटा लीक होईल याची काहीच शाश्वती नसते. 

Updated: Aug 4, 2022, 05:51 PM IST
credit-debit card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! तूमचा पासवर्ड लीक झाला आहे का? title=

Debit - Credit Card Online Fraud: आजकाल आपला सगळा व्यवहार हा ऑनलाईन असतो. त्यातून डिजिटल व्यवहारांसाठी सध्या ओनलाईन बॅंकींगही फार धोकादायक झाले आहे. कधी आपला कुठला डेटा लीक होईल याची काहीच शाश्वती नसते. त्यातून आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरतानाही बराच धोका निर्माण झाला आहे. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले असून यामुळे एका कंपनीचा 1.4 लाख पेमेंट टर्मिनल पासवर्ड लीक झाला आहे. 

जर तूम्ही डेबिट कार्ड वापरत असाल आणि त्यानंतर तूमचा पासवर्ड कोणी तिसऱ्यानेच घेतला तर...? हे असं तूमच्या आमच्यासह कोणाबरोबरही होऊ शकतं. Wiseasy या एका मोठ्या डिजिटल कंपनीसोबतही असंच काहीसे झाले आहे. कंपनीच्या हजारो क्रेडिट कार्ड पमेंट टर्मिनल्सला कंट्रोल करणाऱ्या डॅशबोर्डचा access हॅकर्सच्या हाती लागला आहे. यामुळे कंपनीचा डेटा लीक झाला आहे. ज्यात नाव, फोन नंबर, ईमेल आयडीपासून सगळ्याचाच समावेश आहे. 

कंपनीच्या या टर्मिनलचा पासवर्ड डार्क वेबमध्ये सापडला असून याद्वारे कंपनीचा डेटा लिक झाला आहे आणि या डेटामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा आणि एडमिन्सचा सर्व डेटा सापडला आहे अशी माहिती समोर आली आहे. 

कसा घेतला या फ्रॉडचा शोध? 
हा सगळ्या घोटाळ्याचा आणि चोरीचा रिपोर्ट TechCrunch या सायबर सिक्यूरिटी स्टार्टअपने उघड केला आहे. Wiseasy ही कंपनी एक मोठी एंड्रॉएड बेस्ड पेमेंट टर्मिनल मेकर आहे. Wiseasy या कंपनीचा क्लाऊड डॅशबॉर्ड हॅक झाला आहे. या सिस्टिममध्ये two factor authentication ही नव्हते त्यामुळे हा डेटा हॅकर्सना सहज हॅक करता आला. या उपलब्धतेमुळे हॅकर्स या टर्मिनलचे अॅप काढण्यापासून ते अॅप चालवण्यापर्यंत हाताळू शकत होते. TechCrunch  या कंपनीने या सगळ्याप्रकाराचा स्क्रिनशॉटही काढला आहे.