चडीगढ : पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंगत सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या जगतार सिंह तारा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावन्यात आली आहे. चंडीगढ न्यायालयाने शुक्रवारी हा निर्णय दिला. जगतार सिंह ताराच्या वकिलाने प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
जगतार ताराने न्यायालयाला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले होते की, निर्दयी व्यक्तिच्या हत्येमुळे जर हजारो लोकांचे प्राण वाचणार असतील तर, त्यात गैर काहीच नाही. दरम्यान, या प्रकरणात दोषी ठरविण्या आल्यावर जगतार सिंह ताराने न्यायालयात म्हटले होते की, बेअंत सिंह यांच्या हत्येबाबत मला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही. पुढे त्याने म्हटले की, मी सरकार विरोधात शिखांची लडाई लढली. तसेच, ही लढाई यापूढेही सुरूच राहिन.
१९९५मध्ये बेअंत सिंह यांच्या हत्येबाबतचा सहभार जगतार सिंह तारा याने कबूल केला होता. हा कबुलनामा सुरू वर्षातील (२०१८) जानेवारी महिन्यात न्यायालयाकडे सोपविण्यात आला. दरम्यान, खलिस्तान टायगर फोर्सचा स्वयंघोषीत कमांडर तारा हा बेअंत सिंह यांच्या हत्येचा मास्टरमाईंड आहे. बेअंत सलिंह यांची हत्या ३१ ऑगस्ट १९९५मध्ये करण्यात आली होती. पंजाब सचिवालयासमोर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १८ लोकांचा मृत्यू झाला होता.