Sanjay Raut : संजय राऊत यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी?

Sanjay Raut: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अवघ्या काही दिवसांपूर्वी पत्राचाल घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) सुटका झाली. 

Updated: Nov 28, 2022, 07:07 PM IST
Sanjay Raut : संजय राऊत यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी? title=

Sanjay Raut Hate Speech Case :  राजकीय वर्तुळातून (Political News) मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अवघ्या काही दिवसांपूर्वी पत्राचाल घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) सुटका झाली. संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांचा कारावास भोगल्यानंतर जामीन मिळाला. मात्र यानंतर पुन्हा एकदा राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. यामुळे राऊतांची पुन्हा जेलमध्ये रवानगी होणार की दिलासा मिळणार याकडे लक्ष असणार आहे. (belgaum court summons to shiv sena ubt leader Sanjay raut for inflammatory speech)

बेळगाव कोर्टाने (Belgavi Court) राऊतांना प्रक्षोभक भाषण केलं होतं. या प्रकरणात न्यायालयाने राऊतांना समन्स बजावलंय. समन्सनुसार, राऊतांना 1 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राऊत यांनी आजपासून 4 वर्षांआधी 30 मार्च 2018 रोजी बेळगावी गेले होते. त्यावेळेस राऊतांनी बेळगावी इथे सीमाप्रश्नी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

दरम्यान, "बेळगावसाठी आतापर्यंत 69 जणांनी बलिदान दिलंय. आता महाराष्ट्रासाठी 70 वं बलिदान द्यायला मी तयार आहे", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलंय. त्यामुळे आता राऊत 1 डिसेंबरला उपस्थित राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.