कोलकाता : पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूरमधील मोयना विधानसभा मतदारसंघातील माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार अशोक दिंडा यांच्यावर मंगळवारी निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला झाल्याचा आरोप आहे. त्यांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेनंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे अहवाल मागविला आहे. ते म्हणाले की, “दिंडावरील हल्ल्याच्या संदर्भात मला तातडीने अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.' भाजप उमेदवाराच्या व्यवस्थापकाने सांगितले की, दिंडा रोड शो नंतर परत येत होते, त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या दरम्यान 100 हून अधिक गुंडांनी हल्ला केला.
या हल्ल्यात भाजप नेते अशोक दिंडा यांना किरकोळ दुखापत झाली आहे. माजी क्रिकेटपटू अशोक दिंडा यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. अशोक दिंडाचे मॅनेजर म्हणाले की, “आम्ही रोड शोवरून परत जात असताना ही घटना मोयना बाजाराच्या समोर घडली. तिथे तृणमूल काँग्रेसचे स्थानिक गुन्हेगार शाहजहां अली यांनी आणि इतर शंभर लोकांसह त्याच्यावर काठ्या आणि विटांनी हल्ला केला.'
West Bengal: Former cricketer and BJP candidate from Moyna, Ashok Dinda attacked by unidentified people in Moyna. Details awaited. pic.twitter.com/wxu6mT335v
— ANI (@ANI) March 30, 2021
तृणमूल काँग्रेसने मात्र हा आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की, हा हल्ला भाजपमधील भांडणामुळे झाला. तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अखिल गिरी म्हणाले की, "भाजपमधील जुने लोकं दिंडा यांना पक्षाचा उमेदवार म्हणून स्वीकारू शकत नाहीत, म्हणून त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला." या घटनेशी तृणमूल काँग्रेसचा काही संबंध नाही.'
171 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये होणार बंद
पश्चिम बंगालमधील दुसर्या टप्प्यातील विधानसभा निवडणुका 1 एप्रिल रोजी 4 जिल्ह्यातील 30 मतदारसंघात होणार आहेत. या टप्प्यात 75,94,549 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ते 171 उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरवील. या टप्प्यात बांकुरा, पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा येथे मतदान होणार आहे.
एक दिवसाआधीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मैदानात असलेले भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर देखील नंदीग्राममध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.