महिलांची अंतर्वस्त्रे चोरून टॅरेसवर जायचा अन्....; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Bengaluru Crime : गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पुरुषांकडून महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी केल्याच्या विचित्र घटना समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार बंगळुरूच्या विधान सौधा लेआउटमध्ये घटना घडली आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 15, 2023, 04:45 PM IST
महिलांची अंतर्वस्त्रे चोरून टॅरेसवर जायचा अन्....; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद title=
(फोटो सौजन्य - freepik.com)

Crime News : बेंगळुरुमध्ये (Bengaluru News) एका विकृताचे धक्कादायक कृत्य सीसीटीव्ही (innerwear) कॅमेऱ्यामध्ये (CCTV) कैद झाले आहे. बेंगळुरुच्या लागरेजवळील एका टेरेसवर महिलांची अंतर्वस्त्रे चोरून आणि हस्तमैथुन करणाऱ्या एका व्यक्तीचे संपूर्ण कृत्य एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेली अज्ञात व्यक्ती भाड्याने घर घेण्याच्या बहाण्याने यायचा, अशी माहिती स्थानिकांनी दिली. तो गुपचूप महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडिओही रेकॉर्ड करत होता, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

याप्रकरणी तक्रारीनंतरच कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी (Bengaluru Police) सांगितले. सध्या राजगोपाल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेरेसवर एक तरुण महिलांची अंतर्वस्त्रे चोरताना दिसत आहे. यानंतर तरुणाने घराच्या गच्चीवर हस्तमैथुनही केले. ही घटना पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अज्ञात तरुण छतावर सुकविण्यासाठी ठेवलेले महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा आणि हस्थमेथुनासाठी वापरायचा. चौकशी केली असता, तो भाड्याने घर शोधत असल्याचा दावा करायचा. त्याचे हे कृत्य परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. मंगळुरूमध्येही अशाच एका घटनेत पुरुषांचा एक गट विविध घरांच्या गच्चीतून महिलांचे अंतर्वस्त्र चोरायचा आणि कंडोम दारात सोडून जायचा. पोलीस आता याप्रकरणी तक्रारीची वाट पाहत असून त्यानुसार कारवाई करणार आहेत.

तसेच 2017 मध्ये, एका 30 वर्षीय व्यक्तीला बंगळुरूमधील महाराणी कॉलेजमधील महिलांच्या वसतिगृहातून अंतर्वस्त्र चोरताना पकडण्यात आले होते. पोलिसांच्या चौकशीत आरोपीचे नाव अबू तालीम असे असल्याचे समोर आले होते. तो बंगळुरूच्या टर्फ क्लबमध्ये काम करत होता. त्याच्याजवळ महिलांच्या अंतर्वस्त्रांनी भरलेली पेटी सापडली होती.

मध्य प्रदेशातही असाच प्रकार

असेच एक प्रकरण गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये उघडकीस आले होते. महिलांची अंतर्वस्त्रे चोरल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होता. त्याच्या चोरीचा व्हिडिओही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊन व्हायरल झाला होता. एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीने एका महिलेचे अंतर्वस्त्र चोरले आणि कुर्त्याच्या खिशातून 500 रुपये काढून घेतले. आरोपी कोणत्याही घरात जाऊन केवळ रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंसह  महिलांचे अंत्रवस्त्रही चोरून नेत असे.