Crime News : तंत्रज्ञानाने माणसाचं आयुष्य सोपं केलं आहे. मात्र याच तंत्रज्ञानाने लोकांच्या अडचणी देखील वाढवल्या आहेत. तंत्रज्ञनामुळे गुन्हेगारीच्या घटना देखील झपाट्याने वाढत आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार बंगळुरुमधून समोर आला आहे. बंगळुरुमध्ये एका तरुणीचा तिच्या प्रियकराच्या मोबाईलमधील गॅलरी पाहून जबर धक्का बसला आहे. फोटो डिलीट करण्यासाठी तरुणीने प्रियकराचा मोबाईल घेतला होता. पण मोबाईलच्या फोटो गॅलरीत जाताच तरुणीसमोर प्रियकराचे पितळ उघडं पडलं.
बंगळुरुमध्ये राहणाऱ्या तरुणीने प्रियकराचा मोबाईल तपासला तेव्हा तिला धक्का बसला होता. तरुणी पाच महिन्यांपासून एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही एकत्र काम करायचे. मात्र, जेव्हा मुलीने तिचे खासगी फोटो डिलीट करण्यासाठी घेतला तेव्हा ती चक्रावून गेली. या 22 वर्षीय तरुणीचे आदित्य संतोष नावाच्या 25 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध होते. तरुणीने आदित्यचा मोबाईल तपासला तेव्हा तिला मोबाईल गॅलरीत 13 हजारांहून अधिक न्यूड फोटो असल्याचे आढळले.
यामध्ये काही फोटो हे खरे होते तर काही एडिट केलेले होते. हे फोटो पाहून मुलीला आश्चर्य वाटले. काही फोटोंमध्ये त्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलींचा देखील समावेश होता. तिने लगेचच प्रियकरासोबत संबंध तोडून टाकले. यानंतर फोटो व्हायरल झाला तर माझे काय होईल? या भीतीने मुलीने तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओखळून लगेचच तरुणाला त्याच्या ऑफिसमधून अटक केली आहे. मुलीने कार्यालयातील वरिष्ठांना देखील हा प्रकार सांगितला आणि इतर मुलींना त्रासापासून वाचवण्यासाठी कारवाईची मागणी केली आहे.
रिलेशनशिप दरम्यान आदित्यने तरुणीचे काही वैयक्तिक फोटो काढले होते. दोघेही जवळपास पाच महिने रिलेशनशिपमध्ये होते. तरुणीला आदित्यच्या मोबाईलमधून फोटो डिलीट करायचे होते. म्हणून तिने त्याच्या नकळत आदित्यचा फोन घेतला आणि गॅलरी उघडली. मात्र गॅलरी उघडताच तिला धक्काच बसला. कारण गॅलरीत तरुणी आणि इतर महिलांचे जवळपास 13 हजार न्यूड फोटो होते. तरुणीने तिथेच आदित्यसोबतचे सर्व संबंध संपवले.
कंपनीने दिलं स्पष्टीकरण
दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. "याचा परिणाम इतर महिलांवरही होऊ शकतो. त्याने कार्यालयातील इतर कोणत्याही महिलेला इजा केली नसली तरी त्याच्या हेतूंबद्दल कोणतीही माहिती नाही. फोटो लीक झाले असते तर तिला धक्काच बसला असता," असे कंपनीने म्हटलं आहे.