भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांना कोरोनाची लागण

ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती. 

Updated: Dec 13, 2020, 06:18 PM IST
भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : देशावर असलेलं कोरोनाचं सावट कधी दूर होईल याची प्रतिक्षा सर्वच नागरिक करत आहेत. कोरोना विषाणूची लागण ही फक्त सर्वसामान्य जनतेला होत नसून राजकारणी, कलाकार, खेळाडूंना देखील होत आहे. दरम्यान भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोना झाल्याची बातमी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 

ट्विट करत ते म्हणाले, 'कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणं दिसल्यामुळे मी स्वतःची कोरोना चाचणी केली. माझी चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण माझी प्रकृती आता ठिक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी सर्व नियमांचे पालन करत आहे.' असं जे.पी नड्डा यांनी सांगितलं आहे. 

शिवाय, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करावी असं आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.