मुंबई : कोरोनाकाळानंतर लोकं ONLINE PAYMENTS कडे जास्त वळली आहेत. ज्यामध्ये लोकं त्यांच्या बॅंकेमार्फत कोणालाही Direct पैसे Transfer करु शकतात. यामध्ये कोणतीही Transaction Fee आकारली जात नाही. या उलट कधी कधी ग्राहकांना Reward म्हणून पैसे सुद्धा परत येतात. पण काही वेळेस हे Transaction मध्येच अडकते. त्यामुळे ग्राहकांना कळत नाही की पैसे समोरच्या व्यक्तीला गेले की नाही ते. ज्यामुळे ग्राहक ONLINE PAYMENT करताना घाबरतात.
पण आता हा प्रश्न जवळजवळ सुटला आहे. तुम्हाला जर भीम यूपीआयमार्फत (BHIM UPI) पेमेंट करण्यास समस्या असल्यास, त्या समस्येचे समाधान लवकर आणि सोपं होणार आहे. यासाठी एनपीसीआयने (National Payments Corporation of India) UPI-हेल्प लाईन सुरू केली आहे.
हे सुरु झाल्यामुळे आता जर तुमचे पैसे यूपीआयकडून थांबले किंवा अडकले तर त्याचा Current status तुम्हाला लगेचचं मिळेल. इतकेच नाही तर ग्राहकांना त्यांचा शेवटचा थांबलेला व्यवहार (Pending Transaction) कुठे अडकला आणि त्याचा स्टेटस काय आहे? हे देखील माहित होईल.
जर पेमेंट तुमच्याकडून गेलं नाही किंवा ज्या व्यक्तीला पाठवायचा आहे, त्याला मिळालं नाही, तर तुम्ही त्याबद्दल या हेल्पलाईन नंबरवर तक्रार देखील करू शकता. तसेच तुम्ही व्यापार्याच्या व्यवहाराबद्दल (Merchant transaction) देखील तक्रार करू शकता.
सध्या ही सेवा स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, ICICI Bank बँक या ठराविक यूपीआय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
येत्या काही काळात पेटीएम पेमेंट्स बँक आणि TJSBच्या ग्राहकांनाही ही सेवा उपलब्ध होणार आहे. याशिवाय उर्वरित बँक ग्राहकांसाठीही सेवा लवकरच सुरु होईल.
UPI-Help हे ग्राहकांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण करेल. ज्यामुळे ग्राहक अधिकाधिक पेमेंट UPIमार्फत करतील आणि त्यांना डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये प्रवेश करण्यास प्रोत्साहित करेल.
UPI आईडी ही एक प्रकारची खास आईडी असते. यूपीआयमार्फत ग्राहकांना पैसे पाठवण्या आणि स्वीकारण्यासाठी, त्यांच्या बँक खात्याचा तपशील अकाउंटला जोडून UPI आईडी तयार केले जाते.